CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Goa CM Watches Solar Eclipse: गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी लुटला सूर्यग्रहण पाहण्याचा आनंद

मिरामार समुद्रकिनाऱ्यावर सूर्यग्रहण पाहण्यासाठी विज्ञानप्रेमींची गर्दी

गोमन्तक डिजिटल टीम

Goa CM Watches Solar Eclipse: सन 2022 या वर्षातील अखेरचे सूर्यग्रहण मंगळवारी पाहता आले. जगभरातील अनेक देशांमध्ये हे सूर्यग्रहरण दिले. दरम्यान, गोव्यामध्येही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हे सूर्यग्रहण पाहण्याचा आनंद लुटला.

CM Pramod Sawant

देशभरात पुर्वेकडील कोलकातापासून पश्चिमेकडील मुंबईपर्यंतच्या विस्तृत भागात हे सूर्यग्रहण दिसले. गोव्यात मिरामार समुद्रकिनारी विज्ञानप्रेमींनी हे सूर्यग्रहण पाहण्यासाठी गर्दी केली होती. यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही काही काळ येथे ग्रहण पाहण्यासाठी हजेरी लावली. त्यांनी सर्वांसमवेत खास ग्रहण पाहण्यासाठी असलेल्या विशेष चष्म्यातून हे ग्रहण पाहण्याचा आनंद घेतला.

CM Pramod Sawant

येथे लावण्यात आलेल्या दुर्बिणीतूनही त्यांनी काही काळ सूर्यग्रहणाचे निरीक्षण केले. यावेळी अनेक विज्ञानप्रेमी नागरिक निसर्गाचा हा रम्य सोहळा पाहण्यासाठी मिरामार समुद्रकिनारी उपस्थित होते. भारतात साधारण 4 वाजून 19 मिनिटांनी हे ग्रहण दिसण्यास सुरूवात झाली होती. तेव्हापासून ते सूर्यास्तापर्यंत हे ग्रहण भारतातून दिसले.

ऐन दिवाळी सणात हे सूर्यग्रहण होत असल्याने अनेकांनी सूर्यग्रहण सुटल्यानंतर नद्यांमध्ये अंघोळ केली. दरम्यान, या सूर्यग्रहणानंतर आता या वर्षातले अखेरचे चंद्रग्रहण 8 नोव्हेंबर रोजी दिसणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT