Goa CM Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: बेकायदा अतिक्रमणांवर कारवाईत अपयशी ठरल्यास निलंबन

मुख्यमंत्र्यांचा इशारा; महसुल विभागाची आढावा बैठक

Akshay Nirmale

CM Pramod Sawant: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बुधवारी राज्याच्या महसुल विभागाची आढावा बैठक घेतली. यात त्यांनी अतिक्रमण कारवाईबाबत महत्वाची घोषणा केली आहे. महसुल कर्मचाऱ्यांना जर अतिक्रमण विरोधी कारवाईत अपयश आले तर संबंधित कर्मचारी, अधिकाऱ्यांना निलंबित करू, असा इशारा या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे समजते.

शहरात विविध ठिकाणी बेकायदा अतिक्रमणाचे प्रकार सर्रास घडत असतात. त्यातून शहराची शिस्त बिघडते आणि शहरे गलिच्छ होत असतात. वेळच्यावेळी हे प्रकार रोखणे गरजेचे असते. पण बऱ्याचदा महसूल कर्मचाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते.

बुधवारी मुख्यमंत्री सावंत यांनी महसूल विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला. या राज्यातील महसुलवाढीवर चर्चा झाली. तसेच राज्यातील बेकायदा अतिक्रमणांवर कारवाईबाबतही चर्चा झाली. यावेळी, बेकायदा अतिक्रमणांना कोणत्याही प्रकारे अभय मिळता कामा नये. प्रत्येक बेकायदा अतिक्रमणाविरोधात महसूल विभागाने कारवाई केली पाहिजे. आणि जर या कारवाईत कोणी कसूर करत असेल किंवा बेकायदा अतिक्रमण विरोधी मोहिमेत जर कुणी अपयशी ठरले तर संबंधितांना निलंबित केले जाईल, असा इशारा मुख्यमंत्र्यानी दिल्याचे समजते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT