Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Pramod Sawant: 'विद्यार्थ्यांना बीच नव्हे विज्ञानाची गोडी लावा', शालेय सहलीबाबत मुख्यमंत्र्यांचे आवाहन

Pramod Sawant On School Picnic: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शालेय पिकनिक स्थळांमध्ये बदल करण्याचं आवाहन केलं आहे.

Sameer Amunekar

पणजी: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बुधवारी (२९ जानेवारी) शाळांना शालेय पिकनिक स्थळांमध्ये बदल करण्याचं आवाहन केलं आहे. त्यांनी समुद्रकिनाऱ्यांऐवजी राष्ट्रीय समुद्रशास्त्र संस्था (NIO) आणि राष्ट्रीय ध्रुवीय आणि महासागर संशोधन केंद्र (NCPOR) इत्यादी विज्ञान संस्थांना भेट देण्याचं आवाहन केलं.

पणजी येथे आयोजित भारतीय विज्ञान चित्रपट महोत्सव (SCIFFI) २०२५ च्या उद्घाटनादरम्यान बोलताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी हे आवाहन केलं आहे. शाळेतील मुलांची सहल समुद्रकिनाऱ्यांवर नको, तर विज्ञान संस्थांमध्ये न्या, असं आवाहन त्यांनी राज्यातील शाळांना केलं आहे.

प्रमोद सावंत यावेळी बोलताना म्हणाले, "विज्ञान संस्थांना भेट दिल्यास विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल, विज्ञानाबाबत अधिक ज्ञान मिळेल. विद्यार्थी विज्ञान आणि तंत्रज्ञानात अधिक रस निर्माण करतील. विद्यार्थ्यांना वैज्ञानिक वातावरणाची ओळख करून दिली, तर महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये त्यांची आवड आणि कौशल्यं आणखी वाढतील." असं वृत्त 'टाईम्स ऑफ इंडिया'नं दिलं आहे.

विद्यार्थ्यांचं कौतुक

कोडिंग आणि रोबोटिक्समधील गोव्याच्या भूमिकेवर बोलताना प्रमोद सावंत यांनी गोव्यातील विद्यार्थ्यांच्या कामगिरीकडे लक्ष वेधलं. "भारतात कोडिंग आणि रोबोटिक्समध्ये निवड झालेल्या १०० विद्यार्थ्यांपैकी २२ विद्यार्थी गोव्याचे आहेत. त्यामुळं गोवा हे इतर राज्यांच्या तुलनेत कोडिंगमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या राज्यांपैकी एक आहे." असं प्रमोद सावंत म्हणाले.

गोवा विद्यापीठाचे कुलगुरू हरिलाल मेनन, विज्ञान परिषद अध्यक्ष प्रसाद रंगणेकर आणि इतर मान्यवर या उद्घाटनादरम्यान उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

भारत-पाकिस्तान पुन्हा भिडणार! ODI World Cup 2027 मध्ये एकाच ग्रुपमध्ये दोन्ही संघ; टीम इंडियाचं संपूर्ण Schedule एका क्लिकवर

Industries Load Shedding: उद्योगांना वीज भारमानाचा मोठा फटका; सायंकाळी 5 ते रात्री 1 पर्यंत 50 ते 100 टक्के लोडशेडिंग

Horoscope: शुक्रवार ठरणार लकी! 'या' राशींच्या व्यक्तींना मिळणार आनंदाची बातमी, आर्थिक संकटे दूर होऊन प्रगतीचे मार्ग मोकळे होणार

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

SCROLL FOR NEXT