Pramod Sawant and Narendra Modi | Pramod Sawant Latest News | Pramod Sawant News Dainik Gomantak
गोवा

पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत दिल्लीला रवाना

देशातील बहुसंख्य माध्यम समूहाने केलेल्या जनमत चाचण्यांच्या आधारे गोव्यात भाजपला 14 ते 16 जागा मिळतील असे चित्र दिसत आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: गोवा विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते प्रमोद सावंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी दिल्लीला रवाना झाले आहेत. मंगळवारी सावंत आणि पंतप्रधान मोदी यांची भेट होणार आहे. याचबरोबर मुख्यमंत्री सावंत आणि गोवा भाजप प्रदेश अध्यक्ष सदानंद शेट तानावडे देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. गुरुवारी 10 तारखेला गोव्याच्या जनतेने कुणाला कौल दिला आहे हे स्पष्ट होणार आहे. (Pramod Sawant News Updates)

मुख्यमंत्री सावंत यांचा दावा
2012 च्या विधानसभा निवडणुकीत अनेक दिग्गज काँग्रेस (Congress) नेत्यांनी साखळीत प्रचार केला होता. त्यावेळी आपण सात हजार मतांनी निवडून आलो होतो. त्याचप्रमाणे यावेळीही पाच हजार मताधिक्याने ​निवडून येणार, असे मुख्यमंत्री म्हणाले.

गोव्यात कॉंग्रेसचे पारडे जड?
देशातील बहुसंख्य माध्यम समूहाने केलेल्या जनमत चाचण्यांच्या आधारे गोव्यात काँग्रेस आणि गोवा फॉरवर्डच्या आघाडीला सर्वाधिक 16 ते 18 जागा मिळतील तर भाजपला (BJP) 14 ते 16 जागा मिळतील असे भाकित वर्तवण्यात आले आहे. त्यामुळे गोव्यात 2017 प्रमाणेच त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात येईल असे अंदाज या चाचण्यांमधून पुढे येत आहे. यामुळे मगोप-तृणमूल काँग्रेस, आम आदमी पक्ष (AAP) आणि अपक्षांचे महत्त्व वाढणार असून ते सत्तेत महत्वाची भूमिका बजावणार असा अंदाज आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Assembly Silver Jubilee: रौप्यमहोत्सवात राजकीय सामना रंगला! युरींच्या टीकेला मुख्यमंत्री सावंतांचे जोरदार प्रत्युत्तर; वाचला 'डबल इंजिन' सरकारच्या विकासाचा पाढा

UPI Payment Tracking: स्कूलच्या फीपासून हॉस्पिटलच्या बिलपर्यंत... युपीआय पेमेंट्स ठरणार देशाच्या आर्थिक विकासाचा आरसा; MoSPI कडून मोठा प्रस्ताव

Goa Politics: 'समोसा-कचोरी नको, सगळ्यांनी मिळून शीतकढी जेवा!' सरदेसाईंची महाआघाडीची हाक; 'ही गोमंतकीयांची इच्छा' म्हणत पुढच्या राजकीय खेळीचे संकेत

Goa Politics: सोयरिक तुटल्यात जमा! गोवा फॉरवर्डने 'गोवा फर्स्ट'चे होर्डिंग्ज काढले; आपसोबतच्या युतीवरून गोव्यात राजकीय चर्चांना उधाण

Horoscope 7 October 2026: गुंतवणुकीसाठी शुभ दिवस, बँक बॅलेन्समध्ये होणार तगडी वाढ! बुधवार ठरणार 'या' राशींसाठी गोल्डन डे

SCROLL FOR NEXT