Goa CM flags off train Dainik Gomantak
गोवा

Maha Kumbh Mela 2025: गोव्याहून प्रयागराजसाठी भाविकांचे 'महाप्रयाण'; मुख्यमंत्रीनीं दाखवला पहिल्या ट्रेनला हिरवा झेंडा

Goa to Prayagraj Train: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गुरुवारी करमाळी रेल्वे स्थानकावरून पहिल्या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला

Akshata Chhatre

करमाळी: गोव्याहून प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्यासाठी निघालेल्या पहिल्या रेल्वेला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गुरुवारी (६ फेब्रुवारी) करमाळी रेल्वे स्थानकावरून पहिल्या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. गोव्याहून प्रयागराजला मुख्यमंत्री देवदर्शन यात्रा या योजनेअंतर्गत ही तरतूद करण्यात आली आहे, यामध्ये एकूण तीन रेल्वे गोव्यातील प्रवाशांना घेऊन प्रयागराजचा प्रवास करतील.

गोव्याहून प्रयागराजला निघालेल्या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवताना मुख्यमंत्र्यांनी जमलेल्या लोकांशी संवाद साधला. गोव्यातून यात्रेकरूंना प्रयागराजला जाणं सोपं व्हावं म्हणून राज्य सरकारकडून ही तरतूद केली गेलीये असं मुख्यमंत्री यादरम्यान म्हणाले.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रयोगराजला महाकुंभमेळ्याची जय्यत तयारी केली आहे आणि यासाठी गोव्यातील सामान्य जनतेला देखील उपस्थित राहण्याची संधी मिळावी म्हणून राज्य सरकार प्रयत्नशील आहे असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले. सर्व भाविकांना मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या तसेच महाकुंभमेळ्यात सर्वांनी काळजी घ्यावी असे आवाहन केले.

मडगाव ते प्रयागराज रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक (Madgaon To Prayagraj Train Timing)

  1. पहिली ट्रेन

    6 फेब्रुवारी : मडगाववरून सकाळी 8 वाजता सुटणार

    10 फेब्रुवारी : प्रयागराजवरून संध्याकाळी 4:30 वाजता सुटणार

  2. दुसरी ट्रेन

    13 फेब्रुवारी : मडगाववरून संध्याकाळी 4:40 वाजता सुटणार

    18 फेब्रुवारी : प्रयागराजवरून सकाळी 11:50 वाजता सुटणार

  3. तिसरी ट्रेन

    21 फेब्रुवारी : मडगाववरून रात्री 7:40 वाजता सुटणार

    26 फेब्रुवारी : प्रयागराजवरून सकाळी 10.30 वाजता सुटणार

    या ट्रेनला थिवी आणि करमाळी अशा दोन ठिकाणी थांबा आहे.

मडगावरवरून सुटणाऱ्या ट्रेन किती तासांनी प्रयागराजला पोहोचतील?

गोवा ते प्रयागराज हा ट्रेन प्रवास साधारण ३४ तासांचा असेल, अशी माहिती सरकारच्यावतीने देण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT