Pramod Sawant | Goa News  Dainik Gomantak
गोवा

Goa News: मुख्यमंत्री रमले मुलांमध्ये, नृत्यातही घेतला सहभाग

Goa News: 52 बालभवन केंद्रांद्वारे विविध प्रकारचे उपक्रम राबविले जातात

दैनिक गोमन्तक

Goa News: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बालभवनद्वारे आयोजित बालदिन कार्यक्रमात सहभाग घेतला. मुलांसोबत सेल्फी घेतला, त्यांच्या नृत्यात सहभाग घेतला. पालक आणि बालकांशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले, आपल्याला कामाच्या व्यस्ततेमुळे वेळ देता येत नाही, मात्र तुम्ही मुलांना वेळ द्या.

52 बालभवन केंद्रांद्वारे विविध प्रकारचे उपक्रम राबविले जातात. ज्यात हस्तकला, मातीकाम, चित्रकला, हार्मोनियम संगीत अशा विविध कलांचे ज्ञान 5 ते 16 वर्षांच्या मुलांना देण्यात येते. त्यामुळे पालकांना मी आवाहन करतो, की आपल्या जवळच्या बालभवन केंद्रात आपल्या पाल्यांना प्रवेश द्यावा.

बालभवनातील शिक्षक मुलांना केवळ कलाच शिकवत नाहीत, तर बालमनावर सुसंस्कार करण्याचे काम देखील येथील केले जातात.

विद्यार्थ्यांना ज्यांना संगीतातील बालगंधर्व परीक्षा द्यायची असते, त्यासाठीचे बालभवन हे केंद्र असते, तसेच 300 ते 350 विद्यार्थी ही परीक्षा बालभवन केंद्रातून देतात. बालभवनद्वारे जो बालोत्सव साजरा केला जातो.

8 ते 10 लाख महसूल

बालभवनात येणाऱ्या विद्यार्थ्यांद्वारे हस्तकला, ग्रिटींग कार्ड, व विविध शिल्पे तयार केली जातात यामधून सुमारे 8 ते 10 लाख रूपयांचा महसूल गोळा केला जातो. त्यामुळे गोव्यातील नागरिकांनी आपल्याला हवी असलेली शिल्पे, कार्डस इ. बालभवन केंद्रातून द्यावी जेणेकरून बालभवनचा महसूलात अधिक वाढ होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Sport: 'स्पोर्टिंग'च्या नवोदितांकडे सर्वांच्या नजरा! चॅरिटी कपमधून गोवा फुटबॉल असोसिएशनच्या नव्या मोसमाला सुरुवात; धेंपोविरुद्ध रंगणार थरारक लढत

Goa Women Cricket: पूजा, अथश्री, निखिलाची लक्षवेधी कामगिरी! गोव्याच्या मुलींनी हिमाचल प्रदेशला 18 धावांनी नमवले; स्पर्धेतील दुसरा विजय

Allahabad High Court: 'कोठडीत आरोपीला मारहाण करणं पोलिसांची ऑफिशियल ड्युटी नाही'! हायकोर्टानं यूपी पोलिसांना फटकारलं; काय नेमकं प्रकरण?

Goa ST Reservation: जनगणनेनंतरच गोव्यात 'एसटी' आरक्षण शक्य! मायकल लोबोंचा दावा; अद्ययावत आकडेवारीशिवाय आरक्षणाला न्यायालयीन आव्हानाची शक्यता

Bardez Development: बार्देशच्या कायापालटाचा निर्धार! मायकल लोबोंकडून प्रलंबित विकासकामांना गती; रस्ते, पूल, आरोग्य केंद्रांवर विशेष भर

SCROLL FOR NEXT