CM Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: मंत्रिमंडळ फेरबदलाविषयी मुख्यमंत्र्यांची महत्वाची माहिती; म्हणाले, काही दिवसांतच...

आमदार संकल्प आमोणकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

गोमन्तक डिजिटल टीम

CM Pramod Sawant गोव्याचा मुख्यमंत्री या नात्याने मला वेगवेगळ्या कामांसाठी वारंवार दिल्लीला जावे लागते. मी आंतरराष्ट्रीय ‘डॉक्टर्स डे’ कार्यक्रमासाठी दिल्लीला गेलो होतो. मी पक्षाच्या नेत्यांचीही भेट घेतलीआमोणकर यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांना त्यांच्याकडून अपेक्षा असतील त्या लवकरच पूर्ण होतील.

सध्या मंत्रिमंडळात फेरबदल झालेला नाही, पण येत्या काही दिवसांत तो नक्कीच होईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांच्या वाढदिनानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मुख्यमंत्री गेले असता त्यांना पत्रकारांना विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी वरील उत्तर दिले.

यावेळी मुख्यमंत्री आमोणकर यांना शुभेच्छा देऊन गेल्यानंतर प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, मंत्री सुभाष शिरोडकर, आमदार आलेक्स सिक्वेरा, केदार नाईक, कृष्णा साळकर, आंतोन वाझ, नगरसेविका श्रद्धा आमोणकर यांनी मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

मंत्र्यांची उपस्थिती हीच माझ्यासाठी भेट

माझ्या समर्थकांची मला मोठ्या स्तरावर पाहण्याची इच्छा असणे स्वाभाविक आहे, परंतु माझ्या वाढदिवशी भाजप पक्षाचे नेते, आमदार आणि मंत्री मोठ्या संख्येने उपस्थित राहिले हीच मला वाढदिवसाची मोठी भेट मिळाली आहे.

मुसळधार पाऊस असूनही दिवसभर शुभेच्छा देण्यासाठी आमोणकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांचे आणि हितचिंतकांचे आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT