Goa Airport | Goa Taxi Dainik Gomantak
गोवा

Manohar International Airport : काळ्या-पिवळ्या टॅक्सींना ‘मोपा’त वेगळा स्टँड मंजूर; अॅपधारकांना झुकतं माप

5 जानेवारीला पहिले विमान मोपा तेथील विमानतळावर उतरणार असल्याने वाहतूक आराखडा यापूर्वीच तयार करण्यात आला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

मोपा येथील मनोहर आंतरराष्‍ट्रीय विमानतळावर गोवा टॅक्सी ॲपबरोबरच पेडणे तालुक्यातील काळ्या-पिवळ्या टॅक्सी असोसिएशनला तेथे वेगळा टॅक्सी स्टँड देण्याचे आश्‍वासन सोमवारी 2 जानेवारी रोजी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन सोमवारी रात्री मागे घेण्यात आले.

या टॅक्सी स्टँडवर किती काळ्या - पिवळ्या टॅक्सी असतील याचा आकडा मुख्यमंत्र्यांना कळवल्यानंतर त्यावर शिक्कामोर्तब केले जाईल, असे टॅक्सी असोसिएशनच्या सदस्य तसेच आमदार प्रवीण आर्लेकर यांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्री उपस्थित होते. 5 जानेवारीला पहिले विमान मोपा तेथील विमानतळावर उतरणार असल्याने वाहतूक आराखडा यापूर्वीच तयार करण्यात आला आहे.

काळ्या-पिवळ्या टॅक्सी व गोवा टॅक्सी ॲपमध्ये नोंदलेल्या टॅक्सी चालकांना हाताळण्यासाठी योग्य यंत्रणा उभी करण्यात येईल. टॅक्सी चालकांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेण्यात येईल. यावेळी आमदार आर्लेकर तसेच आंदोलन करणाऱ्या टॅक्सी असोसिएशनच्या सदस्यांनीही मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्‍वासनाबाबत समाधानी आहोत असे स्पष्ट केले. या बैठकीला मंत्री माविन गुदिन्हो आणि मंत्री रोहन खंवटे उपस्थित होते.

गोवा टॅक्सी ॲपला अखेर हिरवा कंदील

काल सोमवारी 2 जानेवारी रोजी झालेल्या राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत बहुप्रतीक्षित आणि चर्चेत असलेल्या गोवा टॅक्सी ॲपला मंजुरी मिळाली. तसेच या टॅक्सी कॅब अॅग्रिगेटर ॲपमध्ये सामील झालेल्या सर्व टॅक्सी चालकांना पुढील दोन वर्षांसाठी सर्व कर माफ केले जातील, अशी घोषणा सरकारच्या वतीने करण्यात आली. यात नूतनीकरण वाहतूक कर, रस्ते कर यांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT