Goa CM Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

एक देश, एक निवडणूक! पहिल्यांदाच बोलले मुख्यमंत्री प्रमोद सावंत, ऐतिहासिक म्हणत केले निर्णयाचे स्वागत

One Nation One Election: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला हा ऐतिहासिक निर्णय आहे, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले.

Pramod Yadav

One Nation One Election

पणजी: गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी 'एक देश, एक निवडणूक' प्रस्तावाला मंजुरी देण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय 'ऐतिहासिक' असल्याचे म्हटले आहे. सरकारचे हे पाऊल किफायतशीर आणि प्रशासनास अनुकूल असल्याचा दावा त्यांनी केला.

केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (18 सप्टेंबर) माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीच्या शिफारशी स्वीकारल्या. यात लोकसभा, राज्य विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याबाबत तरतूद आहे.

मुख्यमंत्री सावंत यांनी शुक्रवारी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना मत व्यक्त केले. 'मी 'एक देश, एक निवडणूक' या निर्णयाचे स्वागत करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला हा ऐतिहासिक निर्णय आहे. त्यांनी कलम 370 रद्द करण्यासह अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत', असे सावंत म्हणाले.

"निवडणुकांसाठी वारंवार आदर्श आचारसंहिता लागू केल्याने प्रशासन व्यवस्थेवर परिणाम होतो, परंतु संपूर्ण भारतामध्ये लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी झाल्यास, देशात वारंवार आदर्श आचारसंहिता लागू करण्याची गरज नाही," असे सावंत म्हणाले.

“हे एक किफायतशीर पाऊल आहे.” गोव्याचे मुख्यमंत्री म्हणाले, “वारंवार निवडणुकांमुळे खर्च वाढतो. पण, एकत्र निवडणुका झाल्यास त्याचा अप्रत्यक्ष फायदा होतो, असे सावंत म्हणाले.

पाच वर्षांतून एकदा निवडणुका घेतल्यास प्रशासकीय निर्णय सुरळीत होण्यास मदत होईल. पाच वर्षांतून एकदा निवडणुका घेतल्यास मतदानाचा टक्का वाढेल. 'एक देश, एक निवडणूक' देशाच्या विकासालाही हातभार लावेल, असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ZIM: हरारेमध्ये श्रेयस अय्यरचा ऐतिहासिक पराक्रम! एमएस धोनीचा 14 वर्षे जुना रेकॉर्ड मोडीत; मैदानावर केला मोठा कारनामा

Pakistan Economic Crisis: पाकड्यांचा कॅनडाच्या तिजोरीवर डोळा! मिळाली 453 कोटींची मोठी 'भीख'; शाहबाज सरकारने भारताविरोधात ओकली गरळ

Alia Bhatt on Student Protest: 'विद्यार्थ्यांच्या धैर्याला, चिकाटीला सलाम...', आलिया भट्टचा CJP च्या आंदोलनाला उघड पाठिंबा Post Viral

VIDEO: माटणे-दोडामार्ग अपघातात मयेतील दुचाकीस्वार ठार

WTC 2027 Final: ICC ची मोठी घोषणा! 9 ते 13 जूनदरम्यान 'द ओव्हल'वर रंगणार वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनल सामना

SCROLL FOR NEXT