CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Panaji Traffic Jam: पणजीच्या वाहतूक कोंडीत अडकले 'मुख्यमंत्री', रुग्णवाहिकाही खोळंबली; गोमंतकीय हैराण

CM Pramod Sawant: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी सायंकाळी पणजीतील १८ जून रोडवर वाहतूक कोंडीचा ‘कटू’ अनुभव घेतला.

Sameer Panditrao

पणजी: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी सायंकाळी पणजीतील १८ जून रोडवर वाहतूक कोंडीचा ‘कटू’ अनुभव घेतला. मुख्यमंत्र्यांच्या वाहनांचा ताफा वाहतूक कोंडीत अडकलाच, शिवाय एक रुग्णवाहिकाही येथे अडकून पडली होती.

पणजीत (Panaji) सध्या स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत कामे सुरू आहेत. त्यामुळे १८ जून रोडवर वाहतुकीचा ताण वाढला आहे. सायंकाळी पाचनंतर या रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसतात. . वाहतूक पोलिसांच्या प्राथमिक नोंदीनुसार, पणजीत दररोज दहा हजारांवर वाहने ये-जा करतात. त्यात सरकारी, तसेच महत्त्वाची आस्थापने, दवाखाने, बँकांच्या प्रमुख शाखा असल्याने येथे येणारे लोक वाहने घेऊनच येतात. त्यात चारचाकी वाहने बरीच असतात.

पार्किंगमुळे अतिरिक्त ताण

१८ जून रोडवर एका बाजूला दुचाकी आणि दुसऱ्या बाजूला चारचाकी वाहनांचे पार्किंग आहे. जुन्ता हाऊसपासून पोलिस स्थानकाकडे जाणारा मार्ग गीता बेकरीजवळ बंद झाला आहे. त्यामुळे शहराबाहेर पडण्यासाठी १८ जून मार्गाचाच वापर करावा लागतो. शुक्रवारी सायंकाळी मुख्यमंत्र्यांच्या वाहनांचा ताफाही १८ जून रस्त्यावरून शहराबाहेर जाण्यासाठी निघाला खरा; पण त्यांनाही वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. स्मार्ट सिटीच्या (Smart City) कामांमुळे सध्या दररोज या मार्गावर वाहतूक कोंडी होते. या वाहतूक कोंडीचा कधी तरी मुख्यमंत्र्यांनाही अनुभव घ्यावा लागेल, असेही वाटले नसेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! 18,000 रुपयांचे बेसिक थेट 72,000 रुपये होणार? फिटमेंट फॅक्टरसह समजून घ्या हे 4 अत्यंत महत्त्वाचे मुद्दे

Thailand Heavy Rainfall: पूराच्या पाण्यात बुडाले बँकॉक, 7 लाख नागरिक प्रभावित, रस्त्यांवर सापांचा वावर; थायलंडमध्ये मुसळधार पावसाचा हाहाकार VIDEO

Teachers Salary Issue: 'त्या' 3 हजार शिक्षिकांना वेतनवाढ कधी? अमित पाटकर आक्रमक; सरकारला 8 दिवसांची मुदत

Goa Politics: काँग्रेससोबत 'आरजी'ची जागावाटपासाठी बैठक; 16 जागांचा प्रस्ताव, सासष्टीत जागेसाठी जोर

'SIR'च्या मुद्द्यावरुन भाजपचा काँग्रेसवर हल्लाबोल; यतिश नाईक म्हणाले, 'हा तर संविधानिक संस्थांवर हल्ला’

SCROLL FOR NEXT