Goa Beach Party  Dainik Gomantak
गोवा

Goa Christmas 2023: नियमोल्‍लंघन! किनाऱ्यांवर पहाटेपर्यंत पार्ट्या

Goa Christmas 2023: खुलेआम जाहिराती : 100 हून अधिक ठिकाणी संगीतरजनी, अधिकारी करतात तरी काय?

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Christmas 2023: नाताळ व नववर्षाच्‍या निमित्ताने किनारी भागांत होणारे ध्‍वनिप्रदूषण रोखण्‍यासाठी खंडपीठाने सरकारला कठोर निर्देश दिले आहेत.

त्‍यानुसार प्रशासनाकडून संगीत वाजविण्‍यासाठी रात्रीची १० ही वेळमर्यादा नक्‍की केली असली अनेक संगीतरजनींच्‍या जाहिरातींमध्‍ये पहाटे ५ वाजेपर्यंत जल्‍लोष सुरू राहील, असा स्‍पष्‍ट उल्‍लेख आहे.

किनारपट्टीवर १०० हून अधिक ठिकाणी रात्रीच्‍या पार्ट्या सुरू असून, सरकारचा त्‍यावर अंकुश नाही, अशी सार्वत्रिक भावना झाली आहे.

सोशल मीडियावरून अशा संगीतरजनींची जोरदार जाहिरात होत आहे. त्‍यासाठी मोठ्या रकमेची तिकिटे घेऊन जाणाऱ्यांचीही संख्‍या कमी नाही.

संगीत वाजविण्‍यास रात्री १२ वाजेपर्यंत कमाल मर्यादा असूनही त्‍याचे सर्रास उल्‍लंघन होत आहे. उपलब्‍ध माहितीनुसार, अनेक आयोजकांनी अधिकाऱ्यांना हाताशी धरून नियमोल्‍लंघन सुरू केले आहे.

कोट्यवधींची उलाढाल

वागातोर, बागा किनारी भागात २३ डिसेंबरपासून १ जानेवारीपर्यंत रात्री पार्ट्या चालणार असून, त्‍यासाठी कोटींच्‍या घरात उलाढाल झाली आहे.

वागातोर-बनाना फॉरेस्‍ट येथे पर्वती ख्रिसमस गॅदरिंग नावाने एक जाहिरात फिरत असून, त्‍यावर रात्री ८ ते पहाटे ६.३० या वेळेत कार्यक्रम सुरू राहतील, असा उल्‍लेख आहे. अशा ठिकाणी प्रशासकीय अधिकारी पोहोचतात का, हा प्रश्‍‍न आहे.

प्रत्‍यक्षात स्‍थिती निराळी :

सनबर्नप्रश्‍नी खंडपीठाच्‍या आदेशाप्रमाणे सरकारने कृती अहवाल सादर केला आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकाऱ्यांसह, पोलिस, मामलेदार यांचे पथक सनबर्न ठिकाणी पाहणी करेल. न्‍यायालयाने किनारी भागात नियमाेल्‍लंघन होणार नाही, याची खबरदारी घेण्‍याचे सूचित केले आहे. परंतु प्रत्‍यक्षात स्‍थिती निराळी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT