Chimbel Gramsabha Dainik Gomantak
गोवा

Chimbel Gramsabha: आश्‍वासन दिले, आठवडा उलटला; खड्डे, कचरा समस्या मात्र ‘जैसे थे’

चिंबल ग्रामसभेत ग्रामस्थ संतप्त

गोमन्तक डिजिटल टीम

Chimbel Gramsabha गेल्या रविवारी (३० जुलै) झालेल्या ग्रामसभेत चिंबलमधील रस्त्यांवर पडलेले खड्डे तसेच कचरा समस्या २-३ दिवसांत सोडविली जाईल, असे आश्‍वासन सरपंचांनी दिले होते. मात्र, आठवडा उलटून गेला तरी तेथील खड्डे व कचरा समस्या ‘जैसे थे’ आहे. दिवसेंदिवस ही समस्या अधिक जटिल होत आहे.

या समस्येमुळे चिंबल परिसरात डेंग्यूचा प्रसार होण्याचा धोका निर्माण झाला आहे. सरपंचांनी दिलेल्या आश्‍वासनानुसार कामे न झाल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.

मागील ग्रामसभेत चिंबल मंचचे अध्यक्ष गुरुदास शिरोडकर व इतर ग्रामस्थांनी चिंबल येथील रस्त्यांवर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांची डागडुजी करण्याची मागणी केली होती. रस्त्याच्या बाजूला पेट्यांमध्ये कचरा भरून वाहत आहे. त्यामुळे तेथे दुर्गंधी पसरली आहे.

आमदार भाजपमध्ये, तरीही...

सांताक्रुझ मतदारसंघाचे आमदार तसेच जिल्हा पंचायत सदस्य हे सत्ताधारी पक्षातील असूनही ही कामे होत नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.

सांताक्रुझच्या आमदारांनी या मतदारसंघातील विकासासाठी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला असल्याचे स्पष्टीकरण दिले होते. मात्र, त्याचे परिणाम चिंबल परिसरात दिसत नाहीत.

दिवसेंदिवस चिंबल येथील परिसर गलिच्छ होण्याबरोबरच दुर्गंधीचे साम्राज्य वाढले आहे. त्यामुळे सरकारने या प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी चिंबल मंचने केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Record: 22 षटकार, 17 चौकार… टी20 क्रिकेटमध्ये ठोकलं 'द्विशतक', 140 किलो वजनाच्या खेळाडूनं घातला धुमाकूळ; गोलंदाजांच्या उडवल्या चिंधड्या

Strait of Hormuz: इराणचा अमेरिकेला 'डिजिटल' दणका! होर्मुजच्या सामुद्रधुनीतील इंटरनेट केबल्सवर नियंत्रण मिळवण्याची तयारी; जागतिक दळणवळण धोक्यात

Shani Gochar 2026: शनीदेवाचा रेवती नक्षत्रात धमाका! 2 जुलैपासून 'या' 3 राशींना लागणार लॉटरी; उत्पन्नात होणार मोठी वाढ

पेडण्यात सिंधुदुर्गची ताजी मासळी, रखडलेल्या प्रकल्पामुळे सुविधांचा अभाव; ग्राहकांचा नाईलाज

Goa Assembly Election 2027: गोव्यात आगामी सरकार काँग्रेसचेच! अमित पाटकरांनी व्यक्त केला विश्वास; केरळ, तमिळनाडू विजयाबद्दल काँग्रेसकडून जल्लोष

SCROLL FOR NEXT