Ola Uber In Goa  Dainik Gomantak
गोवा

Goa Miles चालत नाही, कॅबची सुविधा नाही; कधी सुरू होणार ओला-उबर, मुख्यमंत्र्यांनी दिले उत्तर

गोव्यातील खराब नेटवर्क सुविधेबाबतही दिले उत्तर

Pramod Yadav

Cab Service In Goa: गोव्यात अनेक दिवसांपासून कॅब सुविधेवरून वाद होत आहे. सरकार कॅब सुविधा सुरू करण्याबाबत सकारात्मक असले तरी, स्थानिक टॅक्सी चालकांचा त्याला विरोध होत आहे. गोवा माईल्स (Goa Miles) बाबत देखील सुधारणा करण्याची गरज अनेकवेळा मागणी झाली आहे. दरम्यान, गोव्यात ओला, उबर कधी सुरू होणार याबाबत खुद्द मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी माहिती दिली आहे. टाईम्स नाऊच्या समिट 2022 (Times Now Summit 2022) मध्ये गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत बोलत होते.

टाईम्स नाऊच्या समिटमध्ये मुख्यमंत्री सावंत यांना गोव्यात ओला, उबर कधी सुरू होणार (Ola, Uber In Goa) असा प्रश्न विचारण्यात आला. गोव्यात प्रवास करायचा झाल्यास टॅक्सी चालकांशी वाद घालावा लागतो किंवा गोवा माईल्स वापरावे लागते ते चालतच नाही. त्यामुळे गोव्यात टॅक्सी अॅप कधी सुरू होणार असा प्रश्न विचारण्यात आला आहे.

यावर उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, "गोव्यात टॅक्सीची समस्या होती, पण आम्ही गोवा माईल्स अ‍ॅपमध्ये सुधारणा केली आहे. गोव्यातील 25 टक्के टॅक्सीचालक गोवा माईल्सवरती आले आहेत. गोवा पर्यटन खात्याचे नवीन मोबाईल अ‍ॅप येत आहे. यावर 70 टक्क्याहून अधिकजण जोडले जातील. पुढच्या पर्यटन हंगामापासून गोव्यात पर्यटन विभागाचे टॅक्सी अ‍ॅप लोकांना उपलब्ध असेल."

तसेच, गोव्यात अजूनही अनेक ठिकाणी खराब नेटवर्क सुविधा आहे. यामुळे ऑनलाईन सुविधा वापरण्यास अनेकांना अडचण येते. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री सावंत म्हणाले, गोव्यात आज देखील काही ठिकाणी नेटवर्क समस्या आहे. पण, नवीन पॉलिसी अंतर्गत आम्ही गोव्यातील नेटवर्क सुविधा सुधारण्यासाठी प्रयत्न करत आहोत. येत्या वर्षभरात राज्यात उत्तम नेटवर्क सुविधा असेल असे मुख्यमंत्री म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Record: 22 षटकार, 17 चौकार… टी20 क्रिकेटमध्ये ठोकलं 'द्विशतक', 140 किलो वजनाच्या खेळाडूनं घातला धुमाकूळ; गोलंदाजांच्या उडवल्या चिंधड्या

Strait of Hormuz: इराणचा अमेरिकेला 'डिजिटल' दणका! होर्मुजच्या सामुद्रधुनीतील इंटरनेट केबल्सवर नियंत्रण मिळवण्याची तयारी; जागतिक दळणवळण धोक्यात

Shani Gochar 2026: शनीदेवाचा रेवती नक्षत्रात धमाका! 2 जुलैपासून 'या' 3 राशींना लागणार लॉटरी; उत्पन्नात होणार मोठी वाढ

पेडण्यात सिंधुदुर्गची ताजी मासळी, रखडलेल्या प्रकल्पामुळे सुविधांचा अभाव; ग्राहकांचा नाईलाज

Goa Assembly Election 2027: गोव्यात आगामी सरकार काँग्रेसचेच! अमित पाटकरांनी व्यक्त केला विश्वास; केरळ, तमिळनाडू विजयाबद्दल काँग्रेसकडून जल्लोष

SCROLL FOR NEXT