Goa News | Bhakti Kulkarni Dainik Gomantak
गोवा

Goa News: भक्ती कुलकर्णीची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस

Goa News: गोव्याची इंटरनॅशनल मास्टर बुद्धिबळपटू भक्ती कुलकर्णी हिची प्रतिष्ठेच्या अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

Goa News: गोव्याची इंटरनॅशनल मास्टर (आयएम) बुद्धिबळपटू, ऐतिहासिक बुद्धिबळ ऑलिंपियाड ब्राँझपदक विजेती भक्ती कुलकर्णी हिची प्रतिष्ठेच्या अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.

निवृत्त न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर यांच्या अध्यक्षतेखालील पुरस्कार समितीने 2022 सालच्या क्रीडा पुरस्कारांसाठी खेळाडूंच्या नावांची शिफारस केली आहे, त्यात महिला बुद्धिबळपटू भक्ती कुलकर्णी, पुरुष बुद्धिबळपटू आर. प्रज्ञानंद यांचा समावेश आहे.

एकूण 25 क्रीडापटूंची अर्जुन पुरस्कारासाठी, तर सर्वोच्च ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी टेबल टेनिसपटू अचंता शरथ कमल याची शिफारस करण्यात आली आहे. केंद्राने सरकारने शिफारसीस मान्यता दिल्यानंतर पुरस्कार वितरण होईल.

...तर तिसरी गोमंतकीय

मडगाव येथील 30 वर्षीय भक्ती ‘अर्जुन’ने सन्मानित झाल्यानंतर राष्ट्रीय क्रीडा क्षेत्रातील हा सन्मान प्राप्त करणारी अवघी तिसरीच गोमंतकीय ठरेल. यापूर्वी गोलरक्षक ब्रह्मानंद शंखवाळकर (1997) व आघाडीपटू ब्रुनो कुतिन्हो (2001) या गोमंतकीय फुटबॉलपटूंनाच हा प्रतिष्ठित मिळालेला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अंतराळ शिक्षण गोमंतकीय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्‍याचा मार्ग मोकळा! 'इस्रो'कडून 'केअर्स'च्‍या 'PMU'ला नोंदणीकृत अवकाश शिक्षक म्‍हणून मान्‍यता

Venezuela Earthquake: काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश! भीषण भूकंपानं व्हेनेझुएला उद्ध्वस्त; 10 हजार मृत्यूंची भीती VIDEO

FIFA Suspends ANFA: क्रीडा विश्वात खळबळ! 'फिफा'कडून या देशाच्या फुटबॉल असोसिएशनवर निलंबनाची कारवाई

Rahul Narvekar Marathi Controversy: शोक-पस्तावावर खुलासा..!

Football Stars Legs Insurance: मेस्सी-रोनाल्डोच्या पायांची किंमत बड्या कंपन्यांपेक्षाही जास्त, फुटबॉल स्टार्स विमा का काढतात? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT