Goa Chess Association Election Dainik Gomantak
गोवा

खासदार विनय तेंडुलकर यांना झटका, गोवा बुद्धिबळ संघटना अध्यक्षपदाच्या शर्यतीत कांदोळकरांची बाजी

विनय तेंडुलकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांसाठी कार्यकारी समिती निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात होती.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Chess Association Election : गोवा बुद्धिबळ संघटनेच्या कार्यकारी समितीच्या निवडणुकीत अध्यक्षपदाच्या शर्यतील राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांचा पराभव झाला आहे. तिसवाडीचे महेश कांदोळकर 14 मते मिळवत विजयी झाले असून, तेंडुलकर यांना केवळ सहा मतांवर समाधान मानावे लागले. खासदार तेंडुलकर यांच्यासाठी हा मोठा झटका मानला जात आहे.

विनय तेंडुलकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांसाठी कार्यकारी समिती निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात होती. निवडणुकीत प्रत्येक तालुक्याचे दोन प्रतिनिधी मतदानाचा हक्क बजावला.

अशी आहे मतदानाची आकडेवारी

अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विनय तेंडुलकर (धारबांदोडा तालुका) यांच्यासमोर तिसवाडीचे महेश कांदोळकर यांचे आव्हान होते. कांदोळकर यांना 14 तर तेंडुलकर यांना केवळ सहा मते मिळाली आहेत.

सचिवपदासाठी झालेल्या मतदानात सासष्टीच्या आशेष केणी यांना 14 व काणकोणचे शरेंद्र नाईक यांना 6 मते मिळाली, खजिनदार पदासाठी बार्देशच्या विश्वास पिळर्णकर यांना 14 व मुरगावच्या किशोर बांदेकर यांना 6 मते मिळाली आहेत.

तसेच, दक्षिण गोवा दोन संयुक्त सचिव पदासाठी समीर नाईक (केपे), किशोर गावस देसाई (सांगे) व अमोघ नमशीकर (फोंडा) असे तीन उमेदवार रिंगणात होते. त्यात अमोघ नमशीकर यांना 14 मते मिळाली असून, ते विजयी झाले आहेत.

बुद्धिबळ संघटनेच्या कार्यकारी समितीत एकूण 12 सदस्य आहेत, त्यापैकी सात पदाधिकारी ऑगस्ट 2021 मधील निवडणूक प्रक्रियेत बिनविरोध ठरले होते. 

त्यानंतर अध्यक्ष, सचिव, खजिनदार आणि दक्षिण गोवा संयुक्त सचिवपदाच्या दोन जागांसाठी मतदान आज (रविवारी, ता. 09) पणजीत सकाळी साडेदहा ते दुपारी बारा या कालावधीत पार पडले. मतदान झाल्यानंतर लगेच निकाल जाहीर करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT