Electricity Bill Rises Live Update  Dainik Gomantak
गोवा

Electricity Tariff Hike: वीज दरवाढीच्या शिफारशींना ‘जीसीसीआय’चा आक्षेप; पर्यटन व्यवसायावर प्रतिकूल परिणाम होण्याची शंका

Goa Chamber of Commerce and Industry: गोवा व केंद्रशासित प्रदेशांसाठी वीज किरकोळ पुरवठा दरांत सुधारणा करण्यासाठी संयुक्त वीज नियामक आयोगाने प्रस्तावित केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांवर व दरवाढीच्या शिफारशीवर गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजने आक्षेप नोंदवले आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Electricity tariff hike In Goa

पणजी: गोवा व केंद्रशासित प्रदेशांसाठी वीज किरकोळ पुरवठा दरांत सुधारणा करण्यासाठी संयुक्त वीज नियामक आयोगाने प्रस्तावित केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांवर व दरवाढीच्या शिफारशीवर गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजने आक्षेप नोंदवले आहेत. चेंबरचे महासंचालक संजय आमोणकर यांनी आयोगाला याबाबत पत्र पाठवले आहे.

राज्य सरकारचा हस्तक्षेप कमी होणे या विषयावर चेंबरने नमूद केले आहे की, या प्रस्तावामुळे स्थानिक सरकारचे वीज दर संरचनेवर नियंत्रण कमी होईल. वीज दर हे स्थानिक गरजांनुसार विकसित होणारे असतात, जे राज्य सरकारच्या विवेकबुद्धीवर आधारित असतात.

चेंबरच्या म्हणण्यानुसार, भिन्न उद्योग व सेवांना समान वीज दर लागू करणे अन्याय्य ठरेल. उदा., शिक्षण संस्था,व्यावसायिक इमारती, स्मशानभूमी, चित्रपटगृहे यांना एकाच गटात आणणे योग्य नाही. पारंपरिक व्यवसाय, जसे की पाव ब्रेड बनविणे, याला व्यावसायिक गटात टाकल्यास व्यवसायांना अडचणी येतील.

...तर पर्यटन व्यवसायावर प्रतिकूल परिणाम

प्रस्तावित वेळेच्या-आधारित दरांनुसार वीज दर शिखर कालावधीत सामान्य दराच्या १२० ते १४० टक्क्यांपर्यंत वाढविण्याचा प्रस्ताव आहे. गोवा एक पर्यटन केंद्र असल्यामुळे, अनेक व्यवसाय शिखर कालावधीत कार्यरत असतात. त्यामुळे, या वाढीमुळे पर्यटन व्यवसायावर प्रतिकूल परिणाम होईल. चेंबरने यावर हरकत घेतली असून, शिखर दर १२० टक्क्यांपर्यंत मर्यादित ठेवावा आणि कमी व्यस्त कालावधीसाठी ८० टक्केपर्यंत सवलत द्यावी, अशी मागणी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT