GCET Dainik Gomantak
गोवा

गोवा CET परीक्षा रद्द; अभियांत्रिकी, फार्मसी प्रवेशासाठी JEE Main, NEET चा स्कोअर धरला जाणार ग्राह्य

बी.फार्मा पदवी अभ्यासक्रासाठी NEET स्कोअरच्या प्रवेश आधारे दिला जाईल.

Pramod Yadav

Goa CET: तांत्रिक शिक्षण संचालनालयाने गोवा सामाईक प्रवेश परीक्षा रद्द केली आहे. अभियांत्रिकी आणि फार्मसी पदवी प्रवेशासाठी आता JEE Main, NEET स्कोअर ग्राह्य धरला जाणार आहे.

व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी मागील दोन दशकांपासून GCET परीक्षा आधार होता. परंतु आता ही परीक्षा घेतली जाणार नाही. 2024-25 पासून अभियांत्रिकी आणि वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना जेईई-मेन किंवा राष्ट्रीय पात्रता-सह-प्रवेश परीक्षा (NEET) उत्तीर्ण करावी लागेल.

तंत्रशिक्षण संचालनालय, गोवा यांनी 2024-25 या वर्षासाठी बी.टेक आणि बी.फार्मा अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी गोवा सामायिक प्रवेश परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. सूचनेनुसार गोवा राज्यातील पदवी अभ्यासक्रम अभियांत्रिकी बी.ई. प्रवेश संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE Main) स्कोअर/रँकच्या आधारे प्रवेश दिला जाईल.

जेईई मेन 2024 साठी नोंदणी सुरु झाली असून, नोंदणीची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर आहे. जेईई परीक्षा दोन सत्रात घेतली जाते. सत्र 1 ची परीक्षा NTA द्वारे जानेवारीमध्ये आणि JEE सत्र 2 एप्रिल 2024 मध्ये घेतली जाईल.

तसेच, गोवा राज्यातील 2024-25 या वर्षासाठी बी.फार्मा पदवी अभ्यासक्रमात प्रवेश NEET स्कोअरच्या आधारे दिला जाईल. NEET 2024 नोंदणी अद्याप सुरू झालेली नाही. ही परीक्षा 5 मे 2024 रोजी लेखी पद्धतीने घेतली जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT