Goa Casino Theft: Dainik Gomantak
गोवा

Goa Casino Theft: गोव्यातील कॅसिनोमधून चोरल्या 13 लाख रुपयांच्या कॅसिनो चिप्स

दिल्लीतील दोघांना अटक

Akshay Nirmale

Goa Casino Theft: गोव्याला येणाऱ्या पर्यटकांमध्ये येथील कॅसिनोला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्याही मोठी असते. अनेक राज्यांमध्ये कॅसिनोला परवानगी नसल्याने कॅसिनोतील विविध गेम्स खेळण्यासाठी गोव्याकडे धाव घेणारे अनेकजण असतात.

दरम्यान, गोव्यातील कॅसिनोमधून सुमारे 13 लाख रूपयांच्या कॅसिनो चिप्स चोरल्या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. सुनील कुमार आणि के. डी. ठकराल अशी या दोघा आरोपींची नावे आहेत. हे दोघेही दिल्लीचे रहिवासी आहेत.

याबाबत गोल्डन पीस हॉटेल्स अँड रेस्टॉरंटचे संचालक मुकेश गुलाटी यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. या दोघाही आरोपींनी निओ मॅजेस्टिक कॅसिनोमधून या चिप्स चोरल्या. चोरीच्या हेतूनेच त्यांनी हे कृत्य केले आहे. यातील सर्व चिप्सची किंमत प्रत्येकी एक लाख रूपये इतकी होती.

म्हणजेच 13 लाख रूपयांच्या या 13 चिप्स होत्या. विशेष म्हणजे कॅसिनोमध्ये नियमित जाणारे अनिल मोदी नावाच्या ग्राहकाला या कॅसिनो चिप्स कमी किंमतीत विकण्यात आल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT