Goa Cashew Business  Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील काजूगरांना आले ‘अच्छे दिन’

20 टक्क्यांनी मागणी वाढली: गतवर्षीच्या तुलनेत यंदा दिवाळी झाली ‘गोड’

दैनिक गोमन्तक

सासष्टी: सणासुदीच्या काळात प्रक्रिया केलेल्या काजूगरांचा बाजार तेजीत (Goa Cashew Business) असतो. सणासुदीला नेहमीच्या मनाने दुप्पट उलाढाल होते. जगभरात पसरलेल्या कोरोनामुळे (Corona) गेल्या दोन वर्षांपासून काजूगरांना चांगली मागणी मिळत नव्हती. मात्र, यंदा रक्षाबंधन सणापासून काजूगरांचा बाजार तेजीत असून खास करून सणाचा राजा मानल्या जाणाऱ्या दिवाळीला काजू मागणी गेल्या वर्षीच्या तुलनेत 20 टक्क्यांनी वाढलेली (Cashew Demand increased)आहे.

कोरोना विषाणूच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेमुळे सण, समारंभ, कार्यक्रम आदींवर पूर्णविराम लागला होता तर पर्यटन व्यवसायही पूर्णपणे ठप्प झाला होता. देशात तसेच गोव्यात प्रक्रिया केलेल्या काजूला ज्या प्रकारची मागणी मिळत होती, ती मागणी मिळत नव्हती. मात्र, यंदा ऑगस्ट महिन्यापासून कोरोनाची स्थिती नियंत्रणात येऊ लागल्याने देश तसेच गोव्याचा बाजारपेठेत काजूची मागणी वाढलेली दिसून येत आहे. मार्च, एप्रिल, मे व जून महिन्यात काजूला चांगली मिळाली नाही. पण, ऑगस्ट महिन्यापासून मागणीत वाढ झाली असून दिवाळीला काजूला चांगली मागणी मिळत आहे, अशी माहिती गोवा काजू उत्पादक संघटनेचे खजिनदार सिध्दार्थ झांट्ये यांनी दिली.

भारतात काजूच्या तुकड्याचा वापर बिठाई, स्नेक्स आणि हॉटेल व्यवसायात मोठ्या प्रमाणात होत असून कोरोनामुळे हॉटेल तसेच बिठाई दुकाने संथगतीने चालू असल्यामुळे काजूच्या तुकड्याना जास्त मागणी मिळत नव्हती. पण, यंदापासून काजूच्या तुकड्याना मागणी मिळण्यास सुरवात झाली आहे. गेल्या वर्षी गोव्यातील अनेक कारखानदारांनी कोरोनाच्या भीतीने कारखाने सुरू केलेले नव्हते. मात्र, यंदा कोरोना नियंत्रणात येऊ लागल्याने सर्वांनी कारखाने सुरू केले आहेत, असे सिद्धार्थ झांट्ये यांनी सांगितले.

सर्वत्र देशात पसरलेल्या कोरोना विषाणूविरुद्ध लढण्यासाठी लसीकरण मोहिम सुरू करण्यात आली. भारतात 2021-22 या आर्थिक वर्षात अर्थव्यवस्था पुनरुज्जीवन होण्याची अपेक्षा वर्तविण्यात येत असल्यामुळे यंदा भारतात काजूला मागणी वाढणार आहे. गेल्यावर्षी कोविडच्या आधी काजूची निर्यात करण्यात आल्यामुळे 2019-20 या आर्थिक वर्षात निर्यात वाढली होती. 2020-21 या आर्थिक वर्षात काही प्रमाणात निर्यात कमी झाली होती तर यंदा निर्यात वाढण्याची शक्यता आहे.

- सिध्दार्थ झांट्ये, खजिनदार - काजू उत्पादक संघटना

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT