Goa Cash For Jobs Scam Accused Granted Bail Dainik Gomantak
गोवा

Cash For Job Scam: गोमंतकीयांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या विषया आणि सोनियाला जामीन मंजूर; मडगाव कोर्टाचा निर्णय

Margao Court: मडगावच्‍या प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी पूजा सरदेसाई यांनी संशयीत विषया गावडे आणि सोनिया आचारी या दोघींना 50 हजारांच्या जामिनावर मुक्त करण्याचा आदेश दिला.

Manish Jadhav

मडगाव: मडगावातील 16.12 लाख रुपयांच्‍या ‘कॅश फॉर जॉब’ घोटाळ्‍यात मडगावच्‍या प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी पूजा सरदेसाई यांनी संशयित विषया गावडे आणि सोनिया आचारी या दोघींना 50 हजारांच्या जामिनावर मुक्त करण्याचा आदेश दिला. या दोन्ही संशयितांना गेल्या शनीवारी अटक करण्यात आली होती.

दरम्यान, मडगाव (Margao) मधील एका युवकाला कारवार येथील सी बर्ड नाविक तळावर नोकरी देण्याच्या आमिषाने या दोन्ही महिलांनी त्याच्याकडून पैसे घेतले होते. संशयितांच्‍या वतीने युक्‍तीवाद करताना ॲड. अमेय प्रभुदेसाई यांनी या प्रकरणात पोलिस विषया आणि सोनिया यांना कोठडीत अडकवून ठेऊ पाहत असल्याचा दावा केला.

तर पोलिसांच्‍या वतीने या प्रक़रणात आणखी काही संशयितांचा हात असून त्‍यांच्‍यापर्यंत पोहोचण्‍यासाठी या दोन्‍ही संशयितांना अटकेत ठेवून त्‍यांची चौकशी करण्‍याची गरज आहे, असे निवेदन मडगाव पोलिसांनी या संशयितांच्‍या जामिनाला विरोध करताना दावा केला होता.

दुसरीकडे, या दोन्‍ही संशयितांच्‍या विरोधात मडगावातील सुनील बोरकर यांनी तक्रार केली होती. कारवारच्‍या सीबर्ड नौदल तळावर जनरल ऑफिसरची नोकरी देण्‍याचे आमिष दाखवून त्‍याच्‍याकडून 16.12 लाख रुपये घेतले होते. या दोन्‍ही महिला संशयितांवर फातोर्ड्यातील (Fatorda) कोमरपंत यांनाही अशाचप्रकारे नोकरी देण्‍याचे आमिष दाखवून 27.72 लाखांना लुबाडले होते. मडगावच्‍या प्रक़रणात बोरकर यांनी या महिलांना 8.50 लाख बँकेतून ट्रान्‍सफर केले होते तर अन्‍य रक्‍कम रोख स्‍वरुपात दिली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ECB New Rules: दारूला पूर्ण बंदी, सोशल मीडियावरही नियंत्रण! क्रिकेटपटूंसाठी बोर्डाचे 6 कडक नियम लागू, शिस्तभंगावर करडी नजर

VIDEO: "मनीषाशीच लग्न लावा, नाहीतर जीव देईन"; तरुणी चढली मोबाईलच्या टॉवरवर, समलैंगिक प्रेमप्रकरणाचा हायव्होल्टेज ड्रामा

Crime News: आईवर डोळा, मुलगा ठरला अडथळा; आठ वेळा जमिनीवर आपटून दीड वर्षांच्या चिमुकल्याची हत्या, आरोपीला फाशीची शिक्षा

Rajpal Yadav Jail: राजपाल यादवच्या अडचणीत वाढ! चेक बाऊन्स प्रकरणात हाय कोर्टाचा दणका, 3 महिन्यांच्या कारावासाची शिक्षा

Goa Crime: सिकेरीत रिसॉर्टजवळ सापडला शाहिद आफ्रिदीचा मृतदेह, कांदोळी समुद्रकिनाऱ्यावरून झाला बेपत्ता

SCROLL FOR NEXT