Goa Carnival Dainik Gomantak
गोवा

Goa Carnival: म्हापशात मंगळवारी कार्निव्हल मिरवणूक

म्हापसा येथील कार्निव्हल परेड (मिरवणूक) येत्या मंगळवारी 21 फेब्रुवारी रोजी म्हापसा शहरातून सुरुवात होईल, अशी माहिती म्हापसा कार्निव्हल समितीचे चेअरमन नगरसेवक चंद्रशेखर बेनकर यांनी दिली.

दैनिक गोमन्तक

Goa Carnival: म्हापसा येथील कार्निव्हल परेड (मिरवणूक) येत्या मंगळवारी 21 फेब्रुवारी रोजी म्हापसा शहरातून सुरुवात होईल, अशी माहिती म्हापसा कार्निव्हल समितीचे चेअरमन नगरसेवक चंद्रशेखर बेनकर यांनी दिली. शुक्रवारी म्हापसा पालिकेत आयोजित ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संयुक्त सरचिटणीस मायकल कारास्को, योगेश खेडेकर, अमेय कोरगांवकर हे उपस्थित होते.

कार्यक्रमाची रुपरेषा सांगताना चंद्रशेखर बेनकर म्हणाले की, तारीकडे मिलाग्रीस चर्चपासून वार्षिक पद्धतीप्रमाणे कार्निव्हल परेडला सुरवात होणार असून उपसभापती जोशुआ डिसोझा हे मिरवणुकीस हिरवा बावटा दाखवतील. ही फेरी बोडगेश्वर मंदिराकडे समाप्त होईल.

यंदाच्या कार्निव्हलनिमित्त 18 ते 21 फेब्रुवारी दरम्यान विविध मनोरंजनात्मक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळेल.

18 रोजी सायंकाळी 5 वा. कार्निव्हल कार्यक्रमास सुरवात होणार असून मंत्री नीळकंठ हळर्णकर हे प्रमुख पाहुणे असतील. यानिमित्त नृत्य स्पर्धा, तसेच सर्वेश डान्स ग्रुपचे नृत्य सादरीकरण, त्यानंतर बँडवादन व इतर मनोरंजनात्मक कार्यक्रम होतील.

19 रोजी, फॅन्सी ड्रेस स्पर्धा, डीजे संगीत व इतर मनोरंजनात्मक कार्यक्रम. 20 रोजी नृत्य स्पर्धा, कनन ब्रदर्स फायर शो, बँड वादन व इतर मनोरंजनात्मक कार्यक्रम. याशिवाय प्रसिद्धी गायिका लॉर्ना यांचे खास गायन होणार आहे.

21 रोजी डीजे म्युझिक, बँड वादन व इतर मनोरंजात्नक कार्यक्रम. तर शेवटच्या दिवशी गायिका सोनिया सिरसाट हिचे गायन होईल. हे सर्व कार्यक्रम बोडगेश्वर मंदिरानजीक खुल्या जागेत उभारलेल्या स्टेजस्थळी (व्यासपीठ) होतील, अशी माहिती बेनकर यांनी दिली.

दरम्यान, या व्यतिरिक्त स्टेजस्थळी आकाश पाळणा, खाद्यपदार्थ स्टॉल्स व लहान मुलांसाठी खास मनोरंजनात्मक खेळ असतील. शेवटच्या दिवशी संगीत हे रात्री 12 पर्यंत चालेल, तर इतर तीन दिवशी संगीत रात्री 10 वा.बंद होईल. आमदारांच्या सहकार्याने यंदाचा कार्निव्हल इतर शहरांपेक्षा दर्जेदार व चांगला होईल, असा विश्वास बेनकर यांनी व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांची 'चांदी'! एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात मिळणार गूड न्यूज; 8व्या वेतन आयोगाबाबत आली अपडेट

Horoscope April 2026: मंगळाची कमकुवत स्थिती अन् कुंभ राशीची कसोटी; नोकरीत वाढणार कामाचा ताण, व्यवसायातही सावधगिरीचा इशारा

Pakistan Economic Crisis: आर्थिक त्सुनामीनं पाकड्यांच्या उडाल्या चिंधड्या! युएईनं 2 अब्ज डॉलर्सचं कर्ज मागितलं परत; पाकिस्तानच्या खजिन्याला पडलं खिंडार

"रागाच्या भरात दिली होती तक्रार", सख्ख्या बहिणीची साक्ष फिरली, विनयभंगाच्या आरोपातून संशयित भावाची निर्दोष मुक्तता

Goa Drug Case: गोव्यातील 'नाईट पार्टी' ठरली अखेरची! इंदूरच्या 21 वर्षीय तरुणाचा हणजूणमध्ये संशयास्पद मृत्यू; ड्रग्जचा ओव्हरडोस? तपास सुरु

SCROLL FOR NEXT