Goa Carnival Dainik Gomantak
गोवा

राज्यात कार्निव्हलची जय्यत तयारी सुरू

राज्यात कार्निव्हल धूम; आज ‘किंग मोमो’ची निवड

दैनिक गोमन्तक

पणजी: येत्या 26 फेब्रुवारीपासून कार्निव्हलची धूम सुरू होत असल्याने राज्यात त्याची तयारी जोरदारपणे सुरू झाली आहे. कार्निव्हलचे आकर्षण असलेल्या ‘किंग मोमो’ निवड उद्या 22रोजी होणार असून त्यासाठी पर्यटन खात्याने बैठक आयोजित केली आहे. (goa Carnival Preparations continue vigorously in the state)

पर्यटन खात्याच्या मदतीने कार्निव्हल महोत्सव आयोजित केला जातो. या खात्याकडून ज्या पालिका क्षेत्रामध्ये कार्निव्हल मिरवणूक काढली जाते. त्यांना ठराविक अनुदान दिले जाते. यावर्षी हा कार्निव्हल पणजी, मडगाव (Margao), मुरगाव व म्हापसा या प्रमुख शहारांपुरताच मर्यादित ठेवला गेला आहे. कोविडच्या (Covid-19) पार्श्‍वभूमीवर तो आणखी इतर ठिकाणी होणार नाही. उद्या होणाऱ्या बैठकीसाठी पर्यटन खात्याने पणजी महापालिका, मडगाव पालिका, मुरगाव पालिका व म्हापसा पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना बोलावण्यात आले आहे. किंग मोमो यासाठी 12 फेब्रुवारीला जाहिरात देण्यात आली होती.

अनेक अर्ज यासाठी आले आहेत. या बैठकीत आलेल्या अर्जांवर सविस्तर चर्चा होऊन ‘किंग मोमो’ साठी नाव निश्‍चित करून तो घोषित होण्याची शक्यता आहे. खा प्या व मजा करा असा संदेश किंग मोमोने दिल्यानंतर राज्यात कार्निव्हलला (Goa Carnival) सुरुवात होते. या महोत्सवाला मोठ्या संख्येने देशी व विदेशी पर्यटक गोव्यात येतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sadetod Nayak: काँग्रेस युतीसाठी प्रयत्नशील, आता गोवा फॉरवर्डनेही स्पष्ट भूमिका घेण्याची गरज

Goa Politics: रॉय नाईक यांचा नगरसेवकपदाचा अचानक राजीनामा! फोंड्यापासून मडकईपर्यंत राजकीय चर्चांना उधाण; पुढचा डाव कोणता?

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

SCROLL FOR NEXT