Goa Carnival Dainik Gomantak
गोवा

Goa Carnival: कार्निव्हलवेळी राजधानी गुदमरली!

यंदा ‘स्मार्ट सिटी’च्या कामांसाठी खोदलेले रस्ते आणि वळवलेली वाहतूक यांमुळे गोंगाट, प्रचंड गर्दी, प्रदूषित वातावरणात शनिवारी संध्याकाळी पणजीचा जीव अक्षरश: गुदमरून गेला होता.

दैनिक गोमन्तक

Goa Carnival: राजधानी पणजीत दरवर्षी होणारा कार्निव्हल, ही गोव्याची आंतरराष्ट्रीय ओळख नक्कीच असेल. परंतु यंदा ‘स्मार्ट सिटी’च्या कामांसाठी खोदलेले रस्ते आणि वळवलेली वाहतूक यांमुळे गोंगाट, प्रचंड गर्दी, खोदलेल्या रस्त्यांवर विखुरलेला चिखल, वाहनांचा धूर अशा प्रदूषित वातावरणात शनिवारी संध्याकाळी पणजीचा जीव अक्षरश: गुदमरून गेला होता.

‘खा प्या आणि मजा करा’ असा संदेश देणाऱ्या किंग मोमोची राजवट गोव्यात शनिवारपासून सुरू झाली. कार्निव्हलची भव्य मिरवणूक दिवजा सर्कलपासून कला अकादमीपर्यंत आयोजित केली होती. यासाठी राज्यभरातून नागरिकांनी गर्दी केली होती. त्यात देशी-विदेशी पर्यटकांची संख्याही लक्षणीय होती.

कार्निव्हलच्या निमित्ताने पणजीतील दयानंद बांदोडकर मार्गावरील नेहमीची वाहतूक महात्मा गांधी आणि दादा वैद्य मार्गाने वळविली. तशा सूचना वाहतूक पोलिसांनी अगोदरच दिल्या होत्या.

अशातच ‘स्मार्ट सिटी’च्या कामांसाठी पणजीतील मुख्य रस्त्यांची खोदून अक्षरशः चाळण केली आहे. खोदकामामुळे पणजी चिखलमय झाली असताना आज या रस्त्यांवरूनच वाहतूक वळवल्याने प्रचंड कोंडी झाली.

दुपारपासून पोलिस रस्त्यावर

कार्निव्हलनिमित्त बंदोबस्त व वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी दुपारपासूनच शेकडो पोलिस मिरवणूक मार्गासह अंतर्गत मार्गांवर तैनात केले होते.

दुपारपासूनच पोलिसांनी पणजीतील वाहतूक सुरळीत करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. मात्र, खोदलेल्या रस्त्यांमुळे वाहनचालकांना वाट काढणे अवघड बनले होते. दुचाकीस्वारांचा बेशिस्तपणाही वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरल्याचे पोलिसांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sattari Gaur Attack: सत्तरीत गव्यांचा धुमाकूळ! काढणीला आलेले भाजीपिक काही क्षणांत उद्ध्वस्त; मैंगिणेतील शेतकरी महिलेचे मोठे नुकसान

Tarun Tejpal Case: तेजपाल अखेर म्हापसा न्यायालयात शरण; कोलवाळ तुरुंगात रवानगी, 10 वर्षांच्या शिक्षेविरोधात 'सर्वोच्च'कडे दाद

Dogs Longest Journey: 8 महिने, 3 भाऊ अन् 4126 किलोमीटरचा थरार! प्रेमासाठी रानकुत्र्यांनी ओलांडल्या 5 देशांच्या बॉर्डर; रचला जागतिक रेकॉर्ड

Goa Shack Licenses: गोव्यात शॅक व्यावसायिकांना मोठा दिलासा! ऑक्टोबरपूर्वीच परवाने मिळण्याचे संकेत; 304 अर्जदार पात्र, जागांचे सीमांकन लवकरच

Crime News: 'माझ्या मुलावर खरं प्रेम असेल तर फाशी घे!', अल्पवयीन प्रेयसीनं संपवलं जीवन, प्रियकराची आई गजाआड; नेमकं काय प्रकरण?

SCROLL FOR NEXT