Goa Cancer Screening Camps Dainik Gomantak
गोवा

Goa Health Checkup: राज्यातील तपासणी शिबिरांत 20 जणांना कर्करोगाचे निदान, साडेपाच हजार जणांची आरोग्य तपासणी

Goa Cancer Screening Camps: गोव्यात आतापर्यंत झालेल्या कर्करोग तपासणी शिबिरांमध्ये एकूण साडेपाच हजार जणांची तपासणी करण्यात आली.

गोमंतक ऑनलाईन टीम

सासष्टी: गोव्यात आतापर्यंत झालेल्या कर्करोग तपासणी शिबिरांमध्ये एकूण साडेपाच हजार जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ९६ जणांमध्ये प्राथमिक लक्षणे आढळली असून २० जण कर्करोगपीडित असल्याचे स्पष्ट झाले, अशी माहिती डॉ. जगदीश काकोडकर यांनी दिली.

नावेली-सासष्टी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित केलेल्या कर्करोग तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. याप्रसंगी डॉ. जगदीश काकोडकर यांनी ही माहिती दिली. कर्करोग तपासणीसाठी राज्यात फिरत्या केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे. या केंद्रामार्फत नावेलीतील लोकांची तपासणी करण्यात आली.

अशा तपासणी शिबिरांमध्ये जे कर्करोग पीडित सापडले, त्यांच्यावर सरकारतर्फे सर्व तपासण्या व चाचण्या पूर्ण करण्यात आल्याचे डॉ. काकोडकर यांनी सांगितले. या शिबिरावेळी नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर उपस्थित होते. या शिबिराचा महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. सरकार आरोग्य क्षेत्रात चांगले काम करीत असून पुष्कळ वैद्यकीय सुविधा उपलब्ध केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT