Goa News | Mid-day Meal Scheme  Dainik Gomantak
गोवा

Goa News: 'माध्यान्ह'ची समस्या न सुटल्यास बेमुदत उपोषण

Goa News: बेमुदत उपोषणाचा इशारा आम आदमी पक्षाने दिला आहे.

दैनिक गोमन्तक

Goa News: काणकोण येथील सुमारे 1800 विद्यार्थ्यांना, 1 ऑक्टोबरपासून माध्यान्ह आहार सुविधेपासून वंचित ठेवल्याने, आम आदमी पक्षाने भाजप सरकारवर जोरदार टीका केली. सरकारने ही समस्या सोडवली नाही, तर बेमुदत उपोषणाचा इशारा आम आदमी पक्षाने दिला आहे. ‘आप’ च्या नेत्यांनी शुक्रवारी शिक्षण संचालनालयासमोर निदर्शने केली.

माध्यान्ह आहार न मिळालेल्या 1800 विद्यार्थ्यांना अन्न सुरक्षा भत्ता द्यावा, तसेच या संदर्भात योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी ‘आप’ ने शिक्षण संचालनालयाकडे केली आहे. माध्यान्ह आहारचे दर वाढवण्याच्या प्रस्तावावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याबद्दल, ‘आप’चे प्रदेशाध्यक्ष ॲड. अमित पालेकर यांनी वित्त खात्यावर टीका केली.

Goa Railway: ऐन दिवाळीत आरक्षित तिकिटांवर दलालांचा डल्ला!तक्रारींसाठी हेल्पलाईन

माध्यान्ह आहार सुविधेबद्दल तक्रारी नोंदवण्यासाठी पालकांसाठी एक हेल्पलाईन क्रमांक सुरू करणार असल्याचे पक्षाने जाहीर केले. मुलांना पौष्टिक आहार मिळत नसल्यास, पालकांनी या हेल्पलाईन क्रमांकावर फोन करून त्यांची तक्रार दाखल करावी, असे आवाहन ‘आप’ युवा शाखेच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष सेसिल रॉड्रिग्स यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT