Goa Government| CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: गोवा 'या' क्षेत्रात ग्लोबल हब होऊ शकतो, मुख्यमंत्री सावंत यांनी व्यक्त केला विश्वास

गोव्यात QS इंडिया समिट 2023 हा तीन दिवसीय कार्यक्रमाला संबोधित करताना मुख्यमंत्री सावंत बोलत होते.

Pramod Yadav

CM Pramod Sawant: गोव्यात जागतिक दर्जाच्या संस्था उभ्या राहून, राज्य भविष्यात जगभरातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक केंद्र बनू शकते असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले.

गोव्यात QS इंडिया समिट 2023 हा तीन दिवसीय कार्यक्रम आयोजित केला होता. याच कार्यक्रमाला संबोधित करताना मुख्यमंत्री सावंत बोलत होते.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले, "गोव्यात जागतिक दर्जाच्या संस्था उभ्या रहाव्यात अशी माझी इच्छा आहे. गोवा भविष्यात जगभरातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक केंद्र बनू शकते आणि जगभरातील विद्यार्थी येथे शिक्षण घेऊ शकतात.

गोव्याने यापूर्वीच यासंदर्भातील खासगी विद्यापीठ विधेयक मंजूर केले आहे. शैक्षणिक जागा खुल्या झाल्यामुळे, भारत आशियातील शैक्षणिक केंद्र म्हणून स्थान मिळवू शकेल आणि गोवा एक महत्त्वाचे शैक्षणिक ठिकाण म्हणून प्रस्थापित होण्यासाठी सज्ज असेल."

"शिक्षण हे मानवी विकासाचा मूलभूत पाया आहे आणि गुण नागरिकत्व विकसित करण्याचा महत्वाचा स्त्रोत आहे. गोवा सरकारचा या गोष्टीवर पूर्णपणे विश्वास आहे. गोमन्तकीय लोक जगभरात विस्तारले आहेत. त्यांनी देखील जगभरात गोव्याची शैक्षणिक प्रतिमा उंचावण्यासाठी मदत केली पाहिजे." असेही मुख्यमंत्री म्हणाले.

"गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन रोजगार आणि कौशल्यपूर्ण कर्मचारी निर्मितीवर लक्ष केंद्रित केले जाईल. संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास लक्ष्यात देखील याचाच उल्लेख आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्राथमिक शिक्षणावर लक्ष केंद्रित करून शिक्षण प्रणालीमध्ये परिवर्तन करण्यावर भर दिला आहे."

यावेळी मुख्यमंत्री सावंत यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 कडे लक्ष वेधत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीने आणलेल्या नवीन शैक्षणिक धोरण शिक्षण क्षेत्रात सुधारणा करण्यास मदत करेल असे स्पष्ट केले.

देशाला पुढे नेण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ निर्माण करणारी मजबूत शिक्षण व्यवस्था आपल्याकडे असली पाहिजे, असेही सावंत यांनी म्हटले आहे.

"आम्हाला या गोष्टीचा अभिमान आहे गोवा भारतातील सर्वात साक्षर राज्य आहे आणि राज्याने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे. गोवा हे सर्वाधिक जीडीपी असलेले भारतातील सर्वात लहान राज्य आहे." असेही ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ऑर्डर उशिरा का आणली?' म्हणत डिलिव्हरी बॉयला फ्लॅटमध्ये खेचून मारहाण, तीन मिनिटांचा CCTV व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! पगार किती वाढणार? फिटमेंट फॅक्टर किती असेल? 5 महत्त्वाचे अपडेट्स आले समोर

Rishabh Pant Record: गिलख्रिस्टचा वर्ल्ड रेकॉर्ड उद्ध्वस्त! ऋषभ पंत बनला 'सिक्सर किंग', परदेशात 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू

Investment Fraud: भरघोस परताव्याचं स्वप्न दाखवलं अन् 85.5 लाखांवर डल्ला! शिवोलीतील महिलेची फसवणूक, मुंबईतील दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल

AUS vs BAN: क्रिकेटविश्वात मोठा उलटफेर! बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सनं लोळवलं, 30 मिनिटांत कांगारूंचा खेळ खल्लास Watch Video

SCROLL FOR NEXT