Bull Fight In Goa Dainik Gomantak
गोवा

Bull Fight In Goa: 'धिरयो' आयोजक पोलिसांच्या रडारवर, झुंजी रोखण्यासाठी फोन, व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकासह वेबसाईट जारी

पोलिसांशी संपर्क साधण्यासाठी आवश्यक ते मार्ग उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

Ganeshprasad Gogate

Bull Fight In Goa: मागील काही वर्षांपासून राज्यात अनेक ठिकाणी बैलांच्या बेकायदा झुंजी (धिरयो) लावल्या जातात. खरं तर या ‘धिरयो’ला बंदी असल्याने आणि पोलिस कारवाईच्या भीतीने सहसा धिरयो आयोजित केले जात नाहीत. पण अजूनही काही ठिकाणी छुप्या पद्धतीने धिरयोचे आयोजन केले जाते.

याच कृतीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि बेकायदेशीर झुंजी रोखण्यासाठी उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर आता गोवा पोलिसांनी हेल्पलाइन क्रमांकासह व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक आणि वेबसाईट जारी केली आहे.

पोलिस विभागाने प्रेस नोटमध्ये जनतेला 112 या हेल्पलाइन नंबरवर कॉल करण्याचे किंवा व्हॉट्सअॅप क्रमांक 7875756000 वर मॅसेज करण्याचे आवाहन केले आहे. तसेच गोवा पोलिसांच्या www.goapolice.gov.in या वेबसाइटवर देखील लोकांनी लॉग इन करून बेकायदेशीर झुंजी रोखण्यासाठी पोलीस खात्याला मदत करण्याचे आवाहन केले आहे. .

राज्यात ‘धिरयो’ला बंदी असून अनेक भागात त्या आयोजित केल्या जातात. अनेकदा या धिरयोमध्ये ज्या बैलांचा किंवा रेड्यांच्या झुंजी लावण्यात येतात त्याची जाहिरात  डिजीटल  प्लॅटफॉर्मवरून केली जाते. मात्र याच कृतीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस खाते अलर्ट मोडवर असून पोलिसांशी संपर्क साधण्यासाठी आवश्यक ते मार्ग उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

WTC Points Table: इंग्लंडला डबल झटका! आधी कांगारुंनी मैदानात दिली मात, नंतर WTC पॉइंट टेबलमध्ये झाली घसरण; जाणून घ्या भारताची सध्याची स्थिती

गोव्यात जमीनमालकांना झटका! मुंडकारांना हक्क मिळेपर्यंत जमिनीची विक्री होणार नाही; मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय

Shani Gochar: 2026 नव्हे 2027 मध्ये होणार शनिदेवाचे राशी परिवर्तन, 'या' 5 राशींना राहावं लागणार सावधान; आरोग्य, धन आणि संबंधांवर थेट परिणाम!

Baba Vanga Predictions: 2026 मध्ये 'या' 5 राशीचे लोक होणार मालामाल, बाबा वेंगांची 'अफाट धनलाभा'ची भविष्यवाणी; शनिदेवाची राहणार कृपा!

IFFIESTA: संगीतप्रेमींनो, IFFI घेऊन आलंय 3 धमाकेदार कॉन्सर्ट्स पूर्णपणे मोफत; कधी आणि कुठे? सविस्तर माहिती येथे!

SCROLL FOR NEXT