CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Goa Budget Session 2026: गोव्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! 2025 मध्ये 1 कोटीहून अधिक पर्यटकांनी दिली भेट; मोपा विमानतळ ठरलं गेमचेंजर

Goa Tourism Report 2025: गोवा विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या पर्यटन क्षेत्रातील प्रगतीचा आढावा मांडला.

Manish Jadhav

पणजी: गोवा विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या पर्यटन क्षेत्रातील प्रगतीचा आढावा मांडला. 2025 हे वर्ष गोव्याच्या पर्यटनासाठी खऱ्या अर्थाने सुवर्णवर्ष ठरले असून राज्याने पर्यटकांच्या आगमनाचा आतापर्यंतचा सर्वात मोठा टप्पा ओलांडला. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2025 मध्ये गोव्याला भेट देणाऱ्या एकूण पर्यटकांची संख्या 108.02 लाखांवर पोहोचली. ही आकडेवारी राज्याच्या वाढत्या जागतिक आकर्षणाचे आणि पायाभूत सुविधांच्या यशाचे प्रतीक मानली जात आहे.

या विक्रमी आकडेवारीचे विश्लेषण करताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, यामध्ये देशांतर्गत पर्यटकांचा वाटा सिंहाचा आहे. तब्बल 102.84 लाख भारतीय पर्यटकांनी गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांना आणि सांस्कृतिक वारशांना पसंती दिली. त्याचबरोबर, जागतिक स्तरावर आव्हानात्मक परिस्थिती असतानाही गोव्याच्या विदेशी पर्यटनात सकारात्मक बदल दिसत आहेत. 2025 मध्ये 5.18 लाख आंतरराष्ट्रीय पर्यटकांनी गोव्याला भेट दिली असून, यामुळे राज्याच्या परकीय चलनाच्या महसुलातही मोलाची भर पडली. पर्यटनातील ही सातत्यपूर्ण वाढ राज्याच्या आर्थिक विकासाला नवी गती देणारी ठरत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

गोव्याच्या (Goa) या पर्यटन क्रांतीमध्ये उत्तर गोव्यातील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ (मोपा) सर्वात मोठे 'गेम चेंजर' ठरले. जानेवारी 2023 मध्ये विमानतळ सुरु झाल्यापासून या विमानतळाने विमान वाहतूक क्षेत्रात अभूतपूर्व प्रगती केली. गेल्या तीन वर्षांहून कमी कालावधीत मोपा विमानतळाने 1.40 कोटींहून अधिक प्रवाशांची यशस्वी हाताळणी केली. तसेच, या कालावधीत 97,000 हून अधिक विमानांच्या फेऱ्यांची (Aircraft Movements) नोंद करण्यात आली. मोपा विमानतळाच्या विस्तारामुळे आणि तिथून सुरु झालेल्या नवीन आंतरराष्ट्रीय विमान फेऱ्यांमुळे गोव्यात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत ही लक्षणीय वाढ झाली.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या यशाचे श्रेय केंद्र सरकारच्या 'विकसित भारत' संकल्पनेला आणि राज्याच्या 'स्वयंपूर्ण गोवा' मोहिमेला दिले. दाबोळी आणि मोपा अशा दोन्ही विमानतळांमुळे राज्याची हवाई कनेक्टिव्हिटी मजबूत झाली असून भविष्यात गोव्याला जगातील सर्वात सुरक्षित आणि शाश्वत पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याचा सरकारचा मानस आहे. 2025 च्या या आकडेवारीने गोव्याच्या पर्यटनाला (Tourism) नवी उंची दिली असून, आगामी काळात हे क्षेत्र राज्याच्या अर्थव्यवस्थेला अधिक बळकट करेल, असा ठाम विश्वास मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय भाषणात व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सुवर्णसंधी! गोव्यातील तरुणांसाठी मुख्यमंत्र्यांचा 'नोकरी धमाका', 5000 पदांची होणार भरती; बेरोजगारीच्या प्रश्नावर सरकारचा मास्टरस्ट्रोक

India Russia Oil Import: "दुसऱ्यांच्या तालावर नाचणारा भारत नाही'' रशियन तेल खरेदीसाठी देशाला अमेरिकेच्या परवानगीची गरज नाही; ऊर्जा निर्णयात सरकार सार्वभौम

Goa Education: महिलांसाठी 'मुख्यमंत्री उडान भरारी'ची मोठी घोषणा, मुलींना शाळेतच मिळणार सॅनिटरी पॅड! वाचा अर्थसंकल्पातील 4 महत्त्वाचे निर्णय

Goa Budget Session: अयोध्येतील ‘श्री राम निवास’साठी 25 कोटी! जागा सरकारच्या ताब्यात; रामलल्लाच्या भाविकांसाठी CM सावंतांनी दिली खूशखबर

अनाथांना सरकारी नोकरीत आरक्षण, शिक्षणातही मोठा कोटा; मुख्यमंत्री सावंतांचा मास्टरस्ट्रोक, 'सप्तपदी' अर्थसंकल्पात केल्या 'या' मोठ्या घोषणा

SCROLL FOR NEXT