CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Goa Budget 2025: फोंड्यात छत्रपती शिवाजी महाराज डिजिटल संग्रहालय उभारण्यात येणार; गोवा सरकारची पर्यटनासाठी भरघोस तरतूद

CM Pramod Sawant On Tourism: गोवा विधानसभेच्या तीन दिवसीय अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज (26 मार्च) राज्याचा अर्थसंकल्प (2025-26) मांडला.

Manish Jadhav

पणजी: गोवा विधानसभेच्या तीन दिवसीय अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज (26 मार्च) राज्याचा अर्थसंकल्प (2025-26) मांडला. अर्थसंकल्पात पर्यटन खात्यासाठी 440.98 कोटींची भरघोस तरतूद करण्यात आली. एवढचं नाहीतर मुख्यमंत्र्यांनी आध्यात्मिक पर्यटनाला चालना देण्यासोबत फोंड्यात छत्रपती शिवाजी महाराज डिजिटल संग्रहालय उभारण्यात येणार असल्याचे देखील यावेळी सांगितले.

पर्यटन खात्यासाठी 440.98 कोटीची तरतूद

दरम्यान, नेहमीप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी राज्य पर्यटनाला (Tourism) उभारी देण्यासाठी 440.98 कोटींची तरतूद केली. गोव्यात दरवर्षी मोठ्या संख्येने देश-विदेशातील पर्यटक येतात. गोव्यात येणाऱ्या पर्यटकांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी सरकार खबरदारी घेत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. गेल्या काही महिन्यांत गोवा सरकारने आंंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यटनाच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या देशांशी करार केले आहेत.

आध्यात्मिक पर्यटन

मुख्यमंत्री म्हणाले की, आमचे सरकार आध्यत्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी युद्धपातळीवर काम करत आहे. आम्ही नार्वे येथे गंगा आरती स्थळ विकसित करणार आहोत. याशिवाय, क्रूझ पर्यटनालाही उभारी देण्यासाठी सरकार काम करत असल्याचे देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. गोवा (Goa) सरकारने ‘एकादश तीर्थ’ उपक्रम हाती घेतला असून, यामध्ये राज्यातील 11 पवित्र मंदिरे एकाच आकृतीबंधात समाविष्ट केली जातील. सरकारने सरिता पूजन उपक्रमाची जोड दिली असून यामुळे पर्यटकांना गोव्याच्या समृद्ध सांस्कृतिक, धार्मिक वारशाचा अनुभव घेता येईल, असे पर्यटनमंत्र्यांनी यापूर्वी सांगितले होते.

काय सुरु करण्यात येणार

- ऑनलाईन टॅक्सी सेवा - टॅक्सी चालकांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करणार

- किटला येथे स्काय डायविंग, हवाई क्रिडा अशा साहसी खेळासाठी सुविधा निर्माण करणार

- पर्वरीत टाऊन प्लाझा

- फोंडा येथे छत्रपती शिवाजी महाराज डिजिटल संग्रहालय

- हायस्पीड इंटरनेटसेवा असणारे क्लस्टर तयार केले जाणार

- नार्वे येथे गंगा आरती स्थळ म्हणून विकसित केले जाणार

- युनिटी मॉलचे काम यावर्षी सुरु होणार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Social Media Post Controversy: अभिषेक शर्माची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट आणि फोटोंबाबत कोर्ट देणार अंतरिम आदेश

Sattari Heavy Rain: सत्तरीत वीजवाहिन्यांची मोठी हानी; वादळी वाऱ्यामुळे झाडांची पडझड सुरूच

Vasco Land Project: वास्कोतील सरकारी जमीन लाटण्याचा घाट! गरज पडल्यास विरोधासाठी रस्त्यावर उतरणार- जुझे फिलिप डिसोझा

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

Goa Rough sea: बेतुल येथील फ्लोटिंग जेटी कोसळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, धोकादायक जेटी हटवण्याची मागणी

SCROLL FOR NEXT