Suleman Khan Escape  Dainik Gomantak
गोवा

Goa News: 'त्या' फोन कॉलमुळे सुलेमान अडचणीत? तुरुंग अधिकाऱ्यांकडून मोबाईल जप्त; वाचा गोव्यातील ठळक घडामोडी

Goa Breaking News 12 February 2025: जाणून घ्या गोव्यातील राजकारण,क्रीडा, मनोरंजन आणि इतर ठळक बातम्या

Akshata Chhatre

'त्या' फोन कॉलमुळे सुलेमान अडचणीत? तुरुंग अधिकाऱ्यांकडून मोबाईल जप्त!

कोलवाळ जेलमध्ये न्यायलयीन कोठडीत असलेल्या सुलेमान उर्फ सिद्दीकी खानकडून एक मोबाईल जप्त. तुरुंग अधिकाऱ्यांकडून कारवाई. कोठडीतून सुलेमान खानने गोव्यातील एका खाजगी वृत्तवाहीनीशी साधला होता संपर्क. जेलमध्ये कैद्यासाठी असलेल्या फोनवरुन फक्त कुटूंबातील व्यक्ती, वकील वा मित्र अशा तीन जणांनाच करता येतो संपर्क. त्यामुळे सुलेमानने आपल्याकडील मोबाईलवरुनच वृत्तवाहिनीच्या पत्रकाराशी संपर्क केला असण्याची तुरुंग अधिकाऱ्यांची गोमन्तक टीव्हीकडे बोलताना माहिती.

Goa Culture: मोरजी येथील नाट्यारंभ स्कुल ऑफ आर्टचे अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या नोव्हेंबर परीक्षा सत्रात यश

प्रारंभिक ह्या परीक्षेत एकूण 28 विद्यार्थ्यांन पैकी 27 विद्याथी प्रथम श्रेणीत तर 1 विद्यार्थिनी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण. प्रवेशिका प्रथम परीक्षेत 2 पैकी 1 प्रथम तर 1 व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण

Goa Raid: शेळप-सत्तरीत बेकायदा चिरेखाणीवर धाड

शेळप-सत्तरी येथे बेकायदा चिरेखाणीवर धाड टाकण्यात आली असून, कारवाई दरम्यान २ जेसीबी, ४ पावर टीलर, ४ स्टोन कटर आणि ४ जनरेटर जप्त करण्यात आले आहेत. खाण खात्याने वाळपई पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही चिरेखण चिराग बेग चालवत होता.

Goa Politics: केंद्रीय मंत्री जितिन प्रसादाचे गोव्यात आगमन

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी, वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री आणि लोकसभा खासदार जितीन प्रसाद यांचे गोव्यात आगमन.

Goa News: चापोरा येथे बेकायदेशीर पाणी उपसा आणि पाणी वाहतूक; स्थानिकांच्या तक्रारीनंतर अधिकाऱ्यांकडून पाहणी

चापोरा येथे बेकायदेशीर पाणी उपसा आणि पाणी वाहतूक केली जात असल्याचे समोर आले आहे. स्थानिकांनी तक्रार केल्यानंतर संबंधित सरकारी अधिकाऱ्यांनी पाहणी केली.

Goa Protest: गोव्या बाहेरील लोकांना दिलेल्या MPA वाहतुकीवरुन आंदोलन

ऑल गोवा लॉरी असोसिएशन, ट्रान्सपोर्ट असोसिएशन आणि इतर टिप्पर संघटनांनी गोव्या बाहेरील लोकांना दिलेल्या MPA वाहतुकीवर आंदोलन केले, मुख्यमंत्र्यांच्या तात्काळ हस्तक्षेपाची मागणी.

Pramod Sawant: गोव्यात पिण्याच्या पाण्याचा नवीन विभाग (DDW) सुरु करणार : मुख्यमंत्री

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की पीडब्ल्यूडी आता विभागली गेली आहे आणि नवीन पेयजल विभाग (डीडीडब्ल्यू) घोषित केला आहे. हा विभाग लवकरच कार्यान्वित होऊन पाणीपुरवठ्याचे काम सुरू होईल.

Pramod Sawant: मतदारसंघ स्वच्छ, सुंदर झाल्यास समुद्रकिनाऱ्याऐवजी गावांमध्ये पर्यटक येतील : मुख्यमंत्री

मतदारसंघ स्वच्छ व सुंदर ठेवणे ही जनतेची जबाबदारी आहे. लोकांनी हे पाळले तर समुद्रकिनाऱ्यांना भेट देणारे पर्यटकही खेडोपाडी येऊ लागतील, कारण लोक गोव्यात स्वच्छ आणि स्वच्छ हवेसाठी येतात : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

Pramod Sawant: आंतरराष्ट्रीय कायदा महाविद्यालय प्रकल्प विरोधातील मानसिकता बदला : मुख्यमंत्री

मयेतील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय कायदा महाविद्यालयाला मुख्यमंत्र्यांकडून समर्थन. प्रकल्प विरोधातील मानसिकता बदल. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आवाहन

Mayem News: मये मतदारसंघात 50 कोटींच्या कामांचा शुभारंभ

मये मतदारसंघात 50 कोटींच्या कामांचा शुभारंभ. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते डिजिटल पद्धतीने शुभारंभ.

Goa News: चोपडे ते मोरजी रस्त्याचे रुंदीकरण व हॉट मिक्स डांबरीकरण कामाचा शुभारंभ

चोपडे ते मोरजी रस्त्याचे रुंदीकरण व हॉट मिक्स डांबरीकरण कामाचा शुभारंभ आमदार जीत आरोलकर सरपंच हेमंत चोपडेकर मोरजी सरपंच पवन मोरजे यांच्या उपस्थितीत करण्यात आला

Goa News: श्री देव आजोबा जत्रोत्सवानिमित्त मांद्रेचे माजी सरपंच प्रशांत उर्फ बाळा नाईक यांनी घेतले दर्शन

केरी येथील प्रसिद्ध जागृत देवस्थान श्री देव आजोबा जत्रोत्सवानिमित्त मांद्रेचे माजी सरपंच,विद्यमान पंचायत सदस्य तथा समाजसेवक प्रशांत उर्फ बाळा नाईक यांनी घेतले दर्शन.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Operation Sindoor: 'पोस्ट सोडून मुजफ्फराबादला पळा...', ऑपरेशन सिंदूरने थरारले पाकिस्तानी सैनिक; भारतीय लष्करप्रमुखांचा मोठा खुलासा

Viral Video: बर्फाचा डोंगर घेऊन निघाला...! स्कूटी चालकाची धोकादायक स्टंटबाजी, व्हिडिओ पाहून नेटिझन्सही हैराण; तुम्ही पाहिलाय का?

Anant Chaturdashi 2025 Wishes In Marathi: बाप्पा चालले आपल्या गावाला! अनंत चर्तुदशीनिमित्त नातेवाईकांना शेअर करा 'हे' खास WhatsApp Status

बिट्स पिलानीत 20 वर्षीय विद्यार्थ्याने आयुष्य का संपवले? समोर आले कारण Watch Video

Fake IAS Officer: मुख्यमंत्री-राज्यपालांसोबत फोटो, यूपी-बिहार ते गोवापर्यंत पसरले नेटवर्क, कोट्यवधींचा घातला गंडा; बनावट आयएएस अधिकाऱ्याचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT