Panaji Dainik Gomantak
गोवा

Panaji News : नवे दप्तर, नवे गणवेश अन्‌ बाबा रेनकोटही; मुलांचा आग्रह

Panaji News : राज्यात शालेय साहित्य खरेदीसाठी बाजारात गर्दी

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji News :

पणजी, राज्यात आजपासून (ता. ४) नवीन शैक्षणिक वर्षाला सुरूवात आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी नव्या गणवेशात, नवे दप्तर, नवी छत्री, रेनकोट घेऊन शाळेत जाण्यासाठी सोमवारी पणजी येथील बाजारपेठेत पालकांसहित विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

पालकांनी आपल्या मुलांची हौस भागविण्यासाठी विविधांगी शालेय तसेच पावसाळी साहित्याची खरेदी केली. यंदा शालेय साहित्याच्या दरात मागील वर्षाच्या तुलनेत १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. वह्या, पुस्तके, स्टेकपेन तसेच इतर वस्तूंच्या दरात वाढ झालेली आहे.

रंगबिरंगी छत्र्या आणि कार्टूनचित्राच्या रेनकोटला पसंती

राज्यात अजून मॉन्सूनला सुरुवात झालेली नाही, तरी देखील तुरळक पाऊस पडू लागला आहे. त्यामुळे मुलांना शाळेत ये-जा करण्यासाठी लागणारी छत्री, रेनकोट, पावसाळी चपला, आदींची मोठ्या प्रमाणात खरेदी होत असून मुलांना रंगबिरंगी छत्र्या, तसेच कार्टून चित्र असलेले रेनकोट मुलांना अधिक आकर्षित करत असल्याने मुले पालकांना हे अशा प्रकारच्या रंगबिरंगी छत्र्या तसेच कार्टूनची चित्रे असलेले रेनकोट खरेदीची गळ घालत आहेत. बाजारात २०० रुपये व त्याहून अधिक किमतीच्या छत्र्या बाजारात उपलब्ध आहेत.

जर्नलचे दर वाढले

यंदा शालेय साहित्यात प्रामुख्याने २०० पानी वही, भूगोल आणि विज्ञान विषयासाठी लागणारे जर्नलच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्यावर्षी २५ रुपयांना मिळणार जर्नल यंदा ७५ रूपयांना विकला जात आहे. काही वस्तू जसे की पेन, पेन्सिल आदींच्या दरात तसे मोठे बदल झालेले नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health And Motor Insurance Price Cut: सर्वसामान्यांसाठी खूशखबर! स्वस्त होणार हेल्थ आणि मोटर इन्शुरन्स; अवाजवी कमिशनला लागणार लवकरच ब्रेक

Horoscope 25 Saptember 2026: धनलाभाचा प्रबळ योग आणि यशाचा मार्ग खुला! लाडक्या बाप्पाला निरोप देताना उजळणार 'या' राशींचं भाग्य; ग्रह-नक्षत्रांची मोठी उलथापालथ

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT