अंतर्गत मूल्यांकनावरुन (Internal Assessment) हा निकाल (10th Result) तयार होणार आहे.  Dainik Gomantak
गोवा

Goa Board: दहावीच्या निकालाची प्रक्रिया सुरू

मंडळाने (Goa Board) तयार केलेल्या नियम व निकषानुसार अंतर्गत मूल्यांकन (Internal Assessment) गुणाद्वारे हा निकाल (10th Result) तयार होणार आहे.

Dainik Gomantak

पणजी: राज्यातील दहावीच्या परीक्षा रद्द झाल्यानंतर गोवा राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने शिक्षण तज्ज्ञांच्या व शाळांतील शिक्षकांच्या सहकार्याने तयार केलेल्या नियमानुसार शाळांमध्ये स्थापन केलेल्या निकाल समितीद्वारे दहावीचा निकाल ठरवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

मंडळाने तयार केलेल्या नियम व निकषानुसार अंतर्गत मूल्यांकन गुणाद्वारे हा निकाल तयार होणार आहे. येत्या महिन्यात तो जाहीर होणार आहे. जर विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यांकन गुणाद्वारे तयार केलेला निकाल मान्य नसल्यास त्या विद्यार्थ्याला नव्याने परीक्षा देण्याची संधी उपलब्ध केली जाणार आहे.

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘कोरोना’मुळे दहावीच्या परीक्षा पहिल्यांदाच रद्द करण्यात आल्या. त्यानंतर काही नियम व निकषानुसार शाळांमध्ये स्थापन केलेल्या शिक्षक समित्याद्वारे निकाल तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

शिक्षण मंडळ फक्त तो निकाल जाहीर करणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्याला किवा त्यांच्या पालाकांना पेपर तपासायचा असल्यास त्यांना ती संधी दिली जाणार आहे. त्यांच्या शंकांचे निरसन त्या-त्या शाळेतील निकाल समितीच्या प्रमुखांना करावे लागणार आहे. तसेच जर विद्यार्थी निकालावर संतुष्ट नसल्यास तो पेपर लिहू शकतो, असे शेट्ये यांनी सांगितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT