Goa Board HSSC Admit Card 2024 
गोवा

Goa Board HSSC Admit Card 2024: गोवा बारावी बोर्ड परिक्षेचे हॉल तिकीट प्रसिद्ध; येथे करा डाउनलोड

गोवा 12 वी बोर्डाची परीक्षा 28 फेब्रुवारी ते 18 मार्च 2024 या कालावधीत होणार आहे.

Pramod Yadav

Goa Board HSSC Admit Card 2024: गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (GBSHSE) ने गोवा बोर्ड 12 वी परीक्षा प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध केले आहे.

गोवा 12 वी बोर्डाची परीक्षा 28 फेब्रुवारी ते 18 मार्च 2024 या कालावधीत होणार आहे. बोर्डाने त्यांच्या अधिकृत वेबसाइट gbshse.in वर HSSC परीक्षेच्या प्रवेशपत्राची डाउनलोड लिंक सक्रिय केली आहे.

विद्यार्थ्यांना त्यांची प्रवेशपत्र संबंधित शाळांमधून मिळतील, हॉल तिकीट मिळवण्यासाठी त्यांना संबधित शिक्षक आणि शाळा अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा लागेल.

तसेच, हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी GBSHSE च्या अधिकृत वेबसाइटला भेट देता येईल.

विद्यार्थ्यांनी गोवा बोर्ड HSC ॲडमिट कार्ड 2024 वर दिलेल्या सर्व तपशीलांचे पुनरावलोकन करणे अनिवार्य आहे. कोणत्याही प्रकारची तफावत किंवा त्रुटी लक्षात आल्यास, विद्यार्थ्यांनी तत्काळ शाळेच्या अधिकाऱ्यांना समस्येचे निराकरण करण्यासाठी कळवावे.

विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रवेशपत्र परीक्षा केंद्रात सोबत नेणे आवश्यक आहे. त्याशिवाय विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू दिले जाणार नाही.

अशा पद्धतीने डाउनलोड करा हॉल तिकीट

- बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट म्हणजे gbshse.in ला भेट द्या

- होमपेजवर Goa Board Class 12th Admit Card 2024 या लिंकवर क्लिक करा.

- स्क्रीनवर एक नवीन पृष्ठ दिसेल.

- यात आवश्यक लॉगिन माहिती प्रविष्ट करा आणि सबमिट करा वर क्लिक करा.

- गोवा बोर्ड HSC प्रवेशपत्र 2024 स्क्रीनवर दिसेल.

- प्रवेशपत्र डाउनलोड करा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT