BJP Election Strategy Dainik Gomantak
गोवा

BJP Election Strategy: गोव्यात भाजपचे 'मिशन चौथ्यांदा सत्ता'! 32 हजार कोटींच्या गुंतवणुकीचा निवडणुकीत करणार प्रचार

Goa Assembly Election 2027: आगामी २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत सलग चौथ्यांदा स्पष्ट बहुमत मिळविण्याचे उद्दिष्ट भाजपने ठेवले आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: आगामी २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत सलग चौथ्यांदा स्पष्ट बहुमत मिळविण्याचे उद्दिष्ट भाजपने ठेवले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकारने केलेली पायाभूत गुंतवणूक, विविध विकासकामे आणि लोककल्याणकारी योजनांच्या बळावर पुन्हा सत्ता मिळविण्याचा निर्धार भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला.

यावेळी सावंत सरकारच्या अभिनंदनाचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत राज्यातील विकासकामांचा आढावा घेत आगामी विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीवरही चर्चा झाली. राज्यात सुमारे ३२ हजार कोटी रुपयांची पायाभूत गुंतवणूक करण्यात आल्याचा ठळक उल्लेख ठरावात करण्यात आला.

आरोग्य, कृषी, पायाभूत सुविधा आणि विविध लोककल्याणकारी योजनांच्या माध्यमातून सरकारने केलेल्या कामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यावर भर देण्यात आला. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष अ‍ॅड. नरेंद्र सावईकर यांनी बैठकीतील ठरावाची माहिती दिली. यावेळी आरोग्यमंत्री विश्वजित राणे आणि आदिवासी कल्याणमंत्री रमेश तवडकर उपस्थित होते. सावंत सरकारच्या अभिनंदनाचा ठराव राणे आणि तवडकर यांनी अनुमोदित केला.

प्रचारासाठी प्रभावीपणे रणनीती

सरकारच्या विकासकामांचा आणि योजनांचा आगामी निवडणुकीत प्रचारासाठी प्रभावीपणे वापर करण्याची रणनीती भाजप आखत आहे. सलग चौथ्यांदा बहुमत मिळविण्याचे उद्दिष्ट समोर ठेवताना विकासकामांची माहिती मतदारांपर्यंत पोहोचविणे, संघटनात्मक पातळीवर पक्ष अधिक मजबूत करणे आणि स्थानिक प्रश्नांना सामोरे जाणे, यावरही पक्षाला लक्ष केंद्रित करावे लागणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: युतीची चर्चा जोरात; पण काँग्रेसच्या गोटात धुसफूस!

GFA Election: गोमंतकीय फुटबॉलची धुरा प्रथमच महिलेच्या हाती! वालंका आलेमाव यांचा ऐतिहासिक विजय

Girl Hair Stuck in Gearbox: गोव्यात फेरीबोटीत थरार! हायड्रोलिक गिअर बॉक्समध्ये अडकले दहावीच्या विद्यार्थिनीचे केस

E20 Petrol: पेट्रोलमध्ये 20 टक्क्यांपेक्षा जास्त इथेनॉल मिसळणार? केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांनी स्पष्टच सांगितले!

BJP Election Preparation 2027: गोव्यात 50 टक्क्यांहून अधिक मतांचे लक्ष्य! भाजपला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी नितीन नवीन यांचा कार्यकर्त्यांना 'बुस्ट'

SCROLL FOR NEXT