Dabolim Airport 
गोवा

Dabolim Airport: दाबोळीवर एक चहा 265 रूपयांना, भाजप नेत्याने थेट उड्डाण मंत्रालयाकडे केली लक्ष घालण्याची विनंती

भाजप नेते सिद्धार्थ कुंकळ्ळीकर यांना चहासाठी 250 रुपयांहून अधिक पैसे मोजावे लागले

Pramod Yadav

Dabolim Airport: भारतातील विमानतळांवर मिळणाऱ्या खाद्यपदार्थ आणि शीतपेयांची किंमत प्रवाशांसाठी नेहमीच चिंतेचा विषय राहिला आहे.

विमानतळांवर पाणी आणि चहा यांसारख्या मूलभूत वस्तूंसाठीही जास्त पैसे मोजावे लागतात.  

दक्षिण गोव्यातील दाबोळी विमानतळावर असाच एक प्रकार समोर आला.

भाजप नेते सिद्धार्थ कुंकळ्ळीकर यांना चहासाठी 250 रुपयांहून अधिक पैसे मोजावे लागले, त्यांनंतर त्यांनी याबाबत थेट उड्डाण मंत्रालयाडे प्रश्न उपस्थित केला आहे.

सिद्धार्थ कुंकळ्ळीकर यांनी याबाबत एक ट्विट शेअर केला सोबत चहासाठी मोजलेल्या पैशाचे बिल देखील त्यांनी शेअर केले आहे. कुंकळ्ळीकर यांनी चहासाठी तब्बल ₹265 रुपये मोजले. 

कुंकळ्ळीकर यांनी नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना टॅग करत, या विषयात लक्ष घालण्याची विनंती केली. कदाचित जगातील ही सर्वाधिक चहाची किंमत असावी. असे त्यांनी ट्विट मध्ये म्हटले आहे. 

याला विमानतळाकडून उत्तर देण्यात आले आहे. गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ दाबोळी येथे, चहा/कॉफी, व्हेज आणि नॉन-व्हेज सँडविच फ्लाइंग बाइट्स (डेप चेक इन) आणि मॅगी आउटलेट (आगमन) येथे परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध आहेत. व्हेज सँडविच (120/-), मांसाहारी सँडविच (140/-), कॉफी (110/-) आणि समोसा (2pc - 90/-) असे ट्वविट विमानतळ प्राधिकरणाने केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: 'माझ्या मुलावर खरं प्रेम असेल तर फाशी घे!', अल्पवयीन प्रेयसीनं संपवलं जीवन, प्रियकराची आई गजाआड; नेमकं काय प्रकरण?

Patri Ganpati: मातीची मूर्ती नाही, 21 पत्रींची पुडीच गणरायाचे रूप! काणकोणच्या प्रभुगांवकरांची शेकडो वर्षांची अनोखी चतुर्थी परंपरा

Illegal Banners Goa: म्हापशात 'बॅनर पॉलिटिक्स'चा धुरळा! सत्ताधाऱ्यांचे फलक झळकतात, विरोधकांचे बॅनर रातोरात हटवतात

Most Expensive Iphone 18 Pro: आयफोन 18 प्रो चा लक्झरी अवतार, जगातील सर्वात अलिशान स्मार्टफोन लाँच; 'डार्क रेड' मॉडेलचा नवा जलवा

Goa Crime: पेडणे स्मशानभूमीत अज्ञाताचा कुजलेला मृतदेह! 4-5 दिवसांपूर्वी आणून ठेवल्याचा संशय; खुनाच्या शक्यतेने चतुर्थीत खळबळ

SCROLL FOR NEXT