गोवा

'Har Ghar Tiranga' यशस्‍वी करण्यासाठी भाजपचे मोर्चे सज्ज

'आझादी का अमृत महोत्‍सव'अंतर्गत विविधांगी कार्यक्रम, उपक्रमांचे आयोजन

दैनिक गोमन्तक

पणजी: देशाला स्‍वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण होत असल्‍याच्‍या पार्श्वभूमीवर गोवा भाजपाच्‍या विविध मोर्चांच्‍यावतीने आझादी का अमृत महोत्‍सव आणि हर घर तिरंगा हा उपक्रम यशस्‍वी करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. गोवा भाजपच्‍या युवा मोर्चा यांच्‍यासह एकूण आठ मोर्चाच्‍यावतीने राज्‍यात विविध उपक्रमांचे आयोजन केल्‍याची माहिती आज देण्यात आली.

(Goa BJP ready to make 'Har Ghar Tiranga' program a success)

पक्षाच्‍या येथील कार्यालयात घेतलेल्‍या पत्रकार परिषदेस वासुदेव मेंग गावकर, भारती बांदेकर, सिद्धेश पेडणेकर, अँथनी बार्बोज आदी मान्‍यवर उपस्‍थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या संकल्‍पेनील आझादी का अमृत महोत्‍सव आणि हर घर तिरंगा हा उपक्रम यशस्‍वी करण्यासाठी सर्व मोर्चांनी कंबर कसली असल्‍याचे उपस्‍थित मान्‍यवरांनी सांगितले. सर्व मोर्चाच्‍यावतीने विविध उपक्रम आणि कार्यकम्र राबविण्यात येणार असून केंद्र आणि राज्‍य सरकारच्‍या विकासकामांची आणि सरकारी योजनांनी माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे हा उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

राज्‍यातील सर्व घरे, दुकाने, आस्थापने, बँका, सहकारी संस्‍था, शेतकरी संस्‍था, शेतकरी बांधव आदींनी तिरंगा लावावा, असे आवान किसान मोर्चाचे अध्यक्ष वासुदेव मेंग गावकर यांनी केले. तर युवा मोर्चाच्‍यावतीने राज्‍यातील ३६ मतदारसंघात तिरंगा रॅली काढणार असल्‍याचे सांगण्यात आले. तसेच प्रत्‍येक मतदारसंघात ६ हजारपेक्षा अधिक तिरंगा झेड्यांचे वाटप करण्यात येणार असून राज्‍यातील चार ठिकाणी लोकांसाठी विनामुल्य तिरंगा उपलब्‍ध असल्‍याचे यावेळी सांगण्यात आले.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्‍या संकल्‍पनेतील स्‍वयंपूर्ण चतुर्थी बाजार यशस्‍वी करण्यासाठी राज्‍यातील स्‍वयंसाहाय्य गट, महिला लघुउद्योजकांनी पुढे यावे असे आवाहन भारती बांदेकर यांनी केले. महिला मोर्चाच्‍यावतीने या दरम्‍यान स्‍तन कर्करोग चाचणी शिबिर तसेच बुस्‍टर डोस घेण्यासाठी जनजागृती करण्यात येणार असल्याचे त्‍या म्‍हणाल्‍या.

गेल्‍या महिन्‍यात पाटणा-बिहार येथे झालेल्‍या देशातील सर्व मोर्चांच्‍या परिषदेची माहिती यावेळी देण्यात आली. तसेच या परिषदेला देशाचे गृहमंत्री अमित शाह, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, पी. एल. संतोष अशा अनेक दिग्गजांचे मार्गदर्शन लाभल्याचे यावेळी सांगण्यात आले.

दरम्‍यान, आझादी का अमृत महोत्‍सव आणि हर घर तिरंगा उपक्रम यशस्‍वी करण्यासाठी पक्षाचे पदाधिकारी, आमदार, मंत्री आणि कार्यकर्‍त्‍यांनी जोरदार तयारी केली आहे. संपूर्ण राज्‍य तिरंगामय करण्याचे ठरविण्यात आल्‍याची माहितीही यावेळी देण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT