Goa Viral Post 
गोवा

Goa Viral Post: बाबाजी का ठुल्लू! दक्षिण गोवा उमेदवारीवरुन आप, काँग्रेसची टीका; भाजपचाही पलटवार

Goa Viral Post: माजी खासदार नरेंद्र सावईकर आणि महिला मोर्चाला 'बाबाजी का ठुल्लू' मिळाला, असा आरोप आपचे गोवा संयोजक अमित पालेकर यांनी केला.

Pramod Yadav

Goa Viral Post On South Goa Candidate

भाजपने दक्षिण गोव्यातून उद्योजिका पल्लवी धेंपे यांना लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपमधून किंवा महिला मोर्चातून योग्य उमेदवार मिळाला नाही, त्यामुळे भाजपने उद्योजक महिलेला उमेदवारी दिल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.

माजी खासदार नरेंद्र सावईकर आणि महिला मोर्चाला 'बाबाजी का ठुल्लू' मिळाला असा आरोप आपचे गोवा संयोजक अमित पालेकर यांनी केला.

नरेंद्र सावईकर आणि महिला मोर्चाला 'बाबाजी का ठुल्लू' मिळाला. भाजप व महिला मोर्चामध्ये योग्य उमेदवार नसल्याने उमेदवार त्यांना आयात करावा लागला. ते काय फक्त ढोल वाजविण्यासाठी आहेत का? ढोंगीपणाचा कळस, असे ट्विट आपच्या अमित पालेकर यांनी केले आहे.

याला भाजपचे प्रवक्त गिरीराज पै वेर्णेकर यांनी उत्तर दिले आहे. उमेदवारी जाहीर करुन माघार घ्यावी लागणाऱ्या वेंझी व्हिएगस यांना 'बाबाजी का ठुल्लू' मिळाला आहे. दिल्ली आणि पंजाब येथील जागांच्या बदल्यात गोवा आपच्या कार्यकर्त्यांना त्याग करावा लागला. गोव्यात आप वाढविण्यासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांकडे दुर्लेक्ष करुन २०२२ मध्ये अमित पालेकर यांना मुख्यमंत्री पदाचे उमेदवार करण्यात आले. विसरले? असा पलटवार वेर्णेकर यांनी केला.

एका उद्योजक महिलेला उमेदवारी देऊन भाजपने एकनिष्ठ कार्यकर्त्यांच्या त्याग, समर्पणाकडे दुर्लेक्ष केले आहे. गोव्यातील भाजप नेते दिल्लीतील हिकूमशाही पुढे हतबल असल्याचे दिसून आले आहे, अशा शब्दात विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी टीका केली.

प्रिय युरी तुमचे उमेदवार अद्याप का जाहीर झाले नाहीत, याचे स्पष्टीकरण देऊ शकता का? तुमच्याकडे समर्पित कार्यकर्त्यांचा तुटवडा आहे का? भाजपमधील सर्वजण पल्लवी धेंपे यांच्या उमेदवारीला संपूर्ण समर्थन देतात. तुमचा उमेदवार कुठेय? चार जूनला आणखी एक धक्का सहन करण्यासाठी तयार राहा, असे उत्तर गिरीराज यांनी आलेमाव यांना दिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT