Kiran Kandolkar  Dainik Gomantak
गोवा

Kiran Kandolkar: कार्यकर्ते हाच माझा पक्ष; अन्‍य पक्षांची मला गरज नाही!

Kiran Kandolkar: सरकार तुमच्या दारी गेले, पण प्रत्यक्षात कितीजणांची कामे झाली हे सर्वांनाच माहिती आहे.

दैनिक गोमन्तक

Kiran Kandolkar: मुळात मला कुठल्याही राजकीय पक्षाची गरज नाही. माझे कार्यकर्ते व लोक हाच माझा पक्ष. सध्या मी ‘थिवी विकास मंच’च्या माध्यमातून सक्रिय आहे. त्‍यामुळे भाजपमध्‍ये जाण्‍याचा प्रश्‍‍नच उद्‌भवत नाही, असे स्पष्टीकरण माजी आमदार किरण कांदोळकर यांनी दै. ‘गोमन्‍तक’शी बोलताना दिले.

मध्यंतरी सरकार (Government) तुमच्या दारी गेले, पण प्रत्यक्षात कितीजणांची कामे झाली हे सर्वांनाच माहिती आहे. अशावेळी आता मंत्री तुमच्या दारी जाताहेत, ही चांगली गोष्ट असली तरी प्रत्यक्षात लोकांची कामे झाली पाहिजेत. कारण लोक सरकारकडे व मंत्र्यांकडे अपेक्षेने पाहतात, अशी प्रतिक्रिया देत कांदोळकर यांनी एकप्रकारे सरकारच्या उपक्रमांची स्तुती केली.

याबाबत पत्रकारांशी छेडले असता कांदोळकर म्‍हणाले की, सध्या माझे भाजपकडे कुठलेही वैयक्तिक काम नाही. त्यामुळे बाहेर माझ्याविषयी कोण काय बोलतात याचे मला काही पडलेले नाही. दरम्‍यान, भाजप (BJP) किंवा इतर राजकीय पक्षांची तुम्हाला ऑफर आहे का, या प्रश्‍‍नावर ‘ते नंतर बघूया’ असे सांगत कांदोळकरांनी अधिक बोलणे टाळले.

किरण कांदोळकर, थिवीचे माजी आमदार-

सध्या मी थिवी मतदारसंघात सक्रिय असून लोकसंपर्कात आहे. मी स्वतंत्र व तटस्थ आहे. माझे कार्यकर्ते हीच माझी शक्ती असून ते माझ्या पाठिशी आहेत. त्यांनीच मला सध्या कुठेही जाऊ नकोस असे सुचविले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT