Goa BJP Dainik Gomantak
गोवा

Goa BJP: गोवेकर आम्हालाच मत देणार; पुन्हा भाजपचेच सरकार येणार!

या निवडणुकीत गोवेकर भाजप आमदारांना निवडून देऊन राज्यात पुन्हा भाजपचेच सरकार स्थापन करेल, असा भाजप पक्षाला विश्वास आहे.

दैनिक गोमन्तक

Goa BJP: देशातील पाच राज्यांसाठी यावर्षी विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. गोव्यातही निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. याच पार्श्वभूमीवर सध्याचा गोव्यातील सत्ताधारी पक्ष भाजप (BJP) देखील पुन्हा सत्तेत येण्यासाठी अटीतटीचे प्रयत्न करत आहे.

भाजप पक्षातर्फे आपले उमेदवार जाहीर होत आहेत. स्वत: मुख्यमंत्री आणि इतर आमदारांनी घरोघरी जाऊन आपल्या निवडणूक प्रचाराला सुरुवात केली आहे. यादरम्यान पक्षातर्फे आजवर जी काही विकासकामे केली ती पुन्हा एकदा नव्याने जनतेसमोर आणली जात आहे. मधल्या काळात अनेक भाजपच्या नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकला. पण त्याचा पक्षाला काडीमात्रही फरक पडला नाही. उलट अनेकांनी नव्याने पक्षात प्रवेश केला आहे.

सध्या गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी वेळोवेळी भाजप पक्षाबद्दल अतूट विश्वास व्यक्त केला आहे. त्यांच्यामते 'गोव्यातल्या जनतेने आजवरचे भाजप पक्षाचे कामकाज पाहिले आहे. जनतेचा पक्षावर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे या निवडणुकीत गोवेकर भाजप आमदारांना निवडून देऊन राज्यात पुन्हा भाजपचेच सरकार स्थापन करेल, असा आम्हाला विश्वास आहे.'

या विधानसभा निवडणुकीत (Goa Assembly Elections 2022) नेमके कुणाचे सरकार स्थापन होणार, हे या निवडणुकीत उत्कंठावर्धक असणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT