Amit Patkar, Narendra modi Dainik Gomantak
गोवा

Goa Congress: 'एलपीजीच्या 100 रुपयांच्या आमिषाला लोक भुलणार नाही, गोव्यात पुरेशा रेवड्या आणि खाजे तयार झालंय...

Goa Congress: मला घातकी आणि पातकी लोकांवर भाष्य करायचे नाही- पक्षातून बाहेर पडलेल्यांवर पाटकरांची टीका

Ganeshprasad Gogate

Goa Congress: "गोव्यात जत्रा आणि कालोत्सव सुरू झाले आहेत. गोव्यात पुरेशा रेवड्या आणि खाजे तयार झाले आहेत. लोक मोदी सरकारने एलपीजी दरात 100 रुपये कमी करून दिलेल्या रेवड्यांच्या आमिषाला लोक भुलणार नाही" असा टोला गोवा काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी लगावला आहे.

मला घातकी आणि पातकी लोकांवर भाष्य करायचे नाही. माणिकराव ठाकरेंसोबत झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीमुळे भाजप हादरला आहे.

त्यामुळे विरोधकांवर बोलण्यासाठी त्यांनी भाड्याचे बैल आणून बसवले असल्याची टीका त्यांनी संकल्प आमोणकर आणि यतिश नाईक यांचे नाव न घेता केली आहे.

सध्या जे बोलताहेत ते उपरे असल्याची टीका अमित पाटकर यांनी गुरुवार पणजी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केली आहे.

काल पियुष गोयल यांनी ST आरक्षणाबाबत जी माहिती दिली त्याबद्दल राज्यातील भाजप सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी आनंदोत्सव साजरा करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो आनंदोत्सव नसून तमाशा आणि जुमला असल्याचे पाटकर म्हणाले.

ST बांधवांना आरक्षणासाठी रस्त्यावर यावा लागलं हे या बांधवांचे दुर्दैव आहे. भाजपाला जर खरंच आरक्षण दयायचे असले असते तर ते त्यांनी लगेच दिले असते.

ते पुढच्या अधिवेशनाच्या गोष्टी सांगताहेत मात्र त्यांना हे ठेवून नाही कि 2024 मध्ये आघाडीचे सरकार स्थापन होणार आहे असेही ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT