Digambar Kamat Dainik Gomantak
गोवा

हीरक महोत्सवी निधीचा आणखी एक ‘जुमला’ उघड

भाजप सरकारकडून सामान्यांचा विश्वासघात दिगंबर कामत यांचे विधान

दैनिक गोमन्तक

मडगाव: गेल्या वर्षी जाहीर केलेल्या 300 कोटींच्या हीरक महोत्सवी निधीचा कृती अहवालात उल्लेख न केल्याने मोदी सरकारचा आणखी एक जुमला उघड झाला आहे. आमच्या माहितीप्रमाणे हा निधी सरकारला अजून मिळालेला नाही. या निधीबद्दल गोवा सरकारने स्पष्टीकरण देण्याची गरज आहे, असे मत अर्थसंकल्पावर बोलताना दिगंबर कामत (Digambar Kamat) यांनी मडगावात व्यक्त केले. (goa bjp betrayal of common people says Digambar kamat)

ते पुढे म्हणाले, पगारदार आणि मध्यमवर्गीय, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, तरुण, शेतकरी यांच्यासाठी कोणतीही मदत जाहीर न करून त्यांचा विश्वासघात केला. राज्य आणि केंद्रातील भाजप सरकारने (Goa Government) गोवावासीयांशी केलेली खोटारडेपणा उघड केला आहे. यावेळी सांगेचे उमेदवार प्रसाद गांवकर व दक्षिण गोव्याचे उपाध्यक्ष सुभाष फळदेसाई यावेळी उपस्थित होते.

सीतारमण यांनी 1 फेब्रुवारी 2021 रोजी आपल्या भाषणात गोवा (Goa) राज्य मुक्तीचे हीरक महोत्सवी वर्ष साजरे करत असल्याचे सांगितले होते आणि म्हणून त्यांनी या उत्सवांसाठी गोवा सरकारला 300 कोटी रुपयांची निधी देण्याचा प्रस्ताव ठेवला होता. पण आमच्या राज्याला हा निधी कधीच मिळाला नाही, अशी खंत कामत यांनी व्यक्त केली.

उद्योगांकडे दुर्लक्ष

आम्ही महागाईने होरपळत आहोत. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना कोणताही दिलासा देण्यात आलेला नाही. हे उद्योग रोजगाराच्या संधी निर्माण करत आहेत, ते कोविडच्या काळात सर्वात वाईट स्थितीत होते. मात्र सरकारने त्यांच्यावर दुर्लक्ष केले आहे. खत अनुदानात कपात, अन्नधान्य अनुदान आणि मनरेगा निधीत कपात केल्याने भाजप सरकारचा शेतकरी विरोधी, गरीब विरोधी धोरणाचा चेहरा समोर येत असल्याचा आरोप कामत यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vietnam Boat Accident: व्हिएतनाममध्ये मोठी दुर्घटना! 32 भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली; बचावकार्य सुरू

Tivare Village: तिवरे; हिरवाई, शेतीसंस्कृती आणि परंपरा जपणारे शांत गाव

Goa Mining: कावरे खनिज ब्लॉक; सरकारला दिलासा; खंडपीठाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

Goa Crime: कर्नाटक पोलिसांची म्हापशात धडक; चोरीच्या दागिन्यांचा तपास, गोव्यातील व्यवहार 'महत्त्वाचा दुवा'

Viral Post: इंजिनिअरिंग पूर्ण, 500 ठिकाणी नोकरीसाठी अर्ज... पण इंटरव्ह्यूसाठी एकही कॉल नाही; तरुणाची पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT