Waste Cleaning | Goa News  Dainik Gomantak
गोवा

Goa News: बाजारादिवशीच कचऱ्याची उचल

Goa News: योग्य विल्हेवाट : पालिकेचे सकारात्मक धोरण, सफाई कामगारांचे सहकार्य

दैनिक गोमन्तक

Goa News: आठवडी बाजार म्हटला, की टाकाऊ भाजीपाला आदी कचऱ्याची मोठी समस्या असते. डिचोलीतही पूर्वी ही समस्या होती. पण पालिकेचे सकारात्मक धोरण आणि सफाई कामगारांचे तेवढेच सहकार्य यामुळे आता या समस्येवर बरेच नियंत्रण आले आहे. आठवडी बाजार संपला की त्या रात्रीच कचऱ्याची उचल करून त्याची विल्हेवाट लावण्यात येते.

यापूर्वी आठवडी बाजाराच्या दुसऱ्या दिवशी सकाळी बाजारात गेले, की सर्वत्र कचऱ्याचे विदारक चित्र दिसायचे. बाजारातील या कचऱ्याची उचल होईपर्यंत दुपार उलटायची. तोपर्यंत बाजारात मोठी समस्या निर्माण व्हायची. मात्र, आता आठवडी बाजारानंतर ही समस्या दिसून येत नाही.

मध्यरात्रीपर्यंत साफसफाई

  • बुधवार हा डिचोलीच्या आठवडी बाजाराचा दिवस. बाजारातील विक्रेते रात्री साधारण नऊ वाजण्याच्या सुमारास आपला गाशा गुंडाळतात. त्यानंतर पालिकेच्या सफाई कामगारांची ड्युटी सुरू होते.

  • बाजाराच्या दिवशी भाजी मार्केट आदी बाजारातील सर्वच परिसर टाकाऊ कचऱ्याने व्यापून गेलेला असतो. मात्र, सफाई कामगार रात्रीच कचऱ्याची उचल करण्याच्या कामाला लागतात. यात महिला कामगारांचाही समावेश असतो.

  • मध्यरात्रीपर्यंत साफसफाईचे काम चालू असते. रात्रीच हा कचरा लाखेरे येथील पालिकेच्या कचरा प्रक्रिया प्रकल्पात नेण्यात येतो. दुसऱ्या दिवशी सकाळी बाजारात आल्यास आदल्या दिवशी आठवडी बाजार भरला होता की नाही, त्याबाबत शंका येते.

"आठवडी बाजाराच्या दिवशी रात्रीच कचऱ्याची उचल करण्यात येत असल्याने दुसऱ्या दिवशी बाजारात कचऱ्याची समस्या निर्माण होत नाही. ग्राहकांनाही मनमोकळेपणाने फिरता येते. स्वच्छता मोहिमेत सफाई कामगारांचे योगदान महत्त्वाचे आहे. डिचोली शहर स्वच्छ ठेवण्यासाठी पालिका तत्पर आहे."

- कुंदन फळारी, नगराध्यक्ष, डिचोली

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT