Goa News | Dainik Gomantak
गोवा

Goa News: विठ्ठलापूर-साखळीत आज ‘त्रिपुरारी पौर्णिमा’

Goa News: वाळवंटी पात्रात सज्जता : रंगणार नौकानयन स्पर्धा; भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

दैनिक गोमन्तक

नौकाविहार स्पर्धेमुळे गोव्यासह शेजारील राज्यांमध्‍ये प्रसिद्धीस पावलेला विठ्ठलापूर-साखळी येथील त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव उद्या सोमवारी साजरा होत आहे. या उत्सवासाठी वाळवंटी परिसर सज्ज झाला आहे. हजारो भाविकांच्‍या उपस्‍थितीत होणाऱ्या या उत्‍सवाचे खास वैशिष्ट्य आणि आकर्षण म्हणजे नौकानयन स्पर्धा होय.

Goa News: कोरोना महामारीनंतर दोन वर्षांनी हा उत्सव साजरा होत असल्याने यंदा वाळवंटी नदीकाठी गर्दी उसळण्याची शक्यता आहे. पर्यटन, कला आणि संस्कृती, माहिती आणि प्रसिद्धी खाते आणि विठ्ठलापूर दीपावली उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने उत्सव साजरा करण्यात येणार असून तो यशस्वी करण्‍यासाठी पोलिस, वाहतूक पोलिस आदी सरकारी यंत्रणा सज्ज झाली आहे.

त्रिपुरारी पौर्णिमा उत्सवाचे खास वैशिष्ट्य आणि आकर्षण म्हणजे नौकाविहार स्पर्धा. या स्पर्धेत आकर्षक आणि पर्यावरणपूरक नौका सहभागी होत असतात. दोन वर्षांच्या खंडानंतर यंदा वाळवंटी नदीपात्रात ही स्पर्धा रंगणार आहे. रात्री 10.30 ते मध्यरात्रीपर्यंत ही स्पर्धा रंगणार आहे.

त्रिपुरासुर वध आकर्षण

सायंकाळी 7 वाजता भगवान श्रीकृष्ण मिरवणूक, नंतर वाळवंटी नदीपात्रात दीपदानाचा कार्यक्रम होणार आहे. 7.30 वाजता श्री पांडुरंग देवस्थानच्या प्रांगणात अलंकारतर्फे ‘रसिकरंजन ‘गीत नृत्‍याविष्कार’ हा सांस्कृतिक कार्यक्रम, रात्री10.30 वाजता श्री विठ्ठल-रखुमाईची पालखी मिरवणूक तर 11 वाजता त्रिपुरासुर वध केल्यानंतर आकाशात सारंगा सोडण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tarun Tejpal Case: तेजपालला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का; 3 आठवड्यांत तुरुंगात आत्मसमर्पण करण्याचे आदेश

Goa E20 Petrol: 'ई-20'चा सर्वाधिक फटका गोव्याला? केजरीवालांचा भाजप सरकारवर निशाणा; 40 टक्क्यांहून गोमंतकीयांकडे चारचाकी

Goa Congress: विधानसभा तिकीटासाठी 4 कोटींची बोली? खर्गेंच्या हॉटेल बिलावरूनही ग्रासियस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप

Pakistan AC Blast: पाकिस्तान हादरलं! रुग्णालयात एसी कॉम्प्रेसरचा भीषण स्फोट, 15 नवजात बालकांचा आगीत होरपळून मृत्यू; VIDEO

खरी कुजबुज: धो धो आश्वासने!

SCROLL FOR NEXT