Subhash Shirodkar|Goa News Dainik Gomantak
गोवा

Subhash Shirodkar: सहकार क्षेत्राच्या बळकटीसाठी ; किमान दोनशे सहकारी संस्था निर्माण होणे आवश्यक

Subhash Shirodkar: साखळी येथे राष्ट्रीय सहकार सप्ताह साजरा ; राज्यात नवीन पतसंस्थांची गरज

दैनिक गोमन्तक

Subhash Shirodkar: सहकार क्षेत्राच्या बळकटीसाठी नवीन तत्त्वाचा आधार घेऊन 2023 पर्यंत आणखी किमान दोनशे सहकारी संस्था निर्माण होणे आवश्यक आहे, असे मत सहकार मंत्री सुभाष शिरोडकर यांनी व्यक्त केले.

राष्ट्रीय सहकार सप्ताहनिमित्त थ्रीफ्ट को-ऑपरेटिव्ह असोसिएशनतर्फे आयोजित केलेल्या सोहळ्यात मंत्री शिरोडकर प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. साखळी येथील रवींद्र भवनात हा सोहळा पार पडला.

राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष उल्हास फळदेसाई, सहकार खात्याचे निबंधक विशांत गावणेकर, थ्रीफ्ट को-ऑपरेटिव्ह असोसिएशनचे अध्यक्ष पांडुरंग कुर्टीकर तसेच अशोक परब, एकनाथ मांद्रेकर, कालिदास म्हावळींगकर, सुभाष पार्सेकर, लक्ष्मण नाईक, विकास भगत, रमेश सिनारी, रमेश गावस, आदी वेगवेगळ्या पतसंस्थांचे अध्यक्ष उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छा

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत या सोहळ्याला उपस्थित राहणार होते. मात्र व्यस्त कार्यक्रमामुळे ते उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र त्यांनी ध्वनीचित्रफितीद्वारे संदेश पाठवून शुभेच्छा दिल्या. थ्रीफ्ट को-ऑपरेटिव्ह असोसिएशनच्या प्रगतीची त्यांनी प्रशंसा केली.

उत्कृष्ट संस्था आणि अध्यक्षांचा गौरव

उत्कृष्ट पतसंस्था म्हणून उत्तर गोव्यातून गोवा पिडब्ल्यूडी कर्मचारी सहकारी पतसंस्था तर दक्षिण गोव्यातून वन खाते कर्मचारी सहकारी पतसंस्था, उत्कृष्ट अध्यक्ष म्हणून डिचोली तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष विकास भगत, उत्कृष्ट सचिव म्हणून डिचोली तालुका सरकारी कर्मचारी सहकारी पतसंस्थेची सचिव सुमन भोसले आणि काणकोण सामाजिक आरोग्य केंद्र कर्मचारी सहकारी पतसंस्थेची सचिव सविता सावंत आणि उत्कृष्ट सहकारी म्हणून स्व. दामोदर प्रभू कोचरेकर यांना पुरस्कार वितरीत करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT