CM Pramod Sawant | Goa News Dainik Gomantak
गोवा

Pramod Sawant: 'भिवपाची गरज ना' मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सेझा कामगारांना दिला शब्द

Pramod Sawant: मुख्यमंत्री : कोडलीतील ‘सेझा’च्या कामगारांना ग्वाही

दैनिक गोमन्तक

Pramod Sawant: 31 डिसेंबरपर्यंत राज्यातील सर्व खाण ब्लॉकचा लिलाव अपेक्षित आहे. दोन टप्प्यांत ही प्रक्रिया होणार आहे. कोडली खाण ब्लॉकच्या लिलावास प्राधान्य देण्याची ग्वाही देऊन ‘धीर धरा, सर्व काही व्यवस्थित होईल’, असा दिलासा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कोडली येथील सेझा (वेदांता) कंपनीच्या कामगारांना दिला.

कामगारांच्या भवितव्याचा विचार करून कोडली खाण ब्लॉकचा लिलाव करा, अशी मागणी करण्यासाठी सेझाच्या कामगारांनी रविवारी साखळी येथील रवींद्र भवनजवळ मुख्यमंत्री डॉ. सावंत यांची भेट घेतली. लक्षदीप आर्सेकर यांच्या नेतृत्वाखाली शंभरहून अधिक कामगार साखळीत आले होते. मुख्यमंत्री सावंत यांनी कामगारांचे म्हणणे ऐकून घेत त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला. राज्यातील खाण ब्लॉकच्या लिलावाची प्रक्रिया सर्व सोपस्कारांसह पूर्ण करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

न्यायालयाकडून मिळाला दिलासा

सेझाच्या कोडली खाणीवरील कामगारांना सेवेतून कमी करण्याच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने अंतरिम स्थगिती दिली आहे. त्यामुळे कामगारांना तूर्तास दिलासा मिळाला आहे. वेदांता कंपनीने कर्मचाऱ्यांना सेवेतून कमी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार 1 सप्टेंबर रोजी 443 कर्मचाऱ्यांना सेवेतून कमी करण्याची नोटीस जारी केली होती. या आदेशाविरोधात कामगारांनी मजूर व रोजगार मंत्रालयाकडे अर्ज केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT