Kelbai Devi Mandir Dainik Gomantak
गोवा

Goa Utsav: देवस्थानशी संबंधित उत्सवांत 'त्या' पदाधिकाऱ्यांकडून 'खो'

Goa Utsav: देवस्थान समितीतील दोन पदाधिकारी 'खो' घालण्याचे कृत्य करतात.

दैनिक गोमन्तक

Goa Utsav: मयेतील श्री केळबाय देवस्थानशी संबंधित उत्सव किंवा मंदिर बंद करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी वस्तुस्थिती जाणून घेतानाच आम्हा लोकांना विश्वासात घ्यावे, अशी मागणी केळबायवाडा येथील ग्रामस्थांच्या बैठकीत करण्यात आली.

देवस्थानशी संबंधित उत्सवात प्रत्येकवेळी गावाशी संबंध नसलेले देवस्थान समितीतील दोन पदाधिकारी 'खो' घालण्याचे कृत्य करतात, असा आरोपही या बैठकीत करून संबंधितांचा निषेधही करण्यात आला.

अलीकडेच झालेल्या नवरात्रोत्सवावेळी देवस्थान समितीने हरकत घेतल्याने काहीसा तणाव निर्माण झाला होता. नवरात्रोत्सवातील कार्यक्रमांवर बंदी घालण्याचा आदेशही प्रशासनाने घेतला होता. त्याचबरोबर गणपती विसर्जन तळी आणि मंडप बांधकाम करण्यासही हरकत घेतली होती.

त्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी काल रविवारी केळबायवाडा येथील श्री केळबाय मंदिरात बैठक घेण्यात आली. या बैठकीस नाईक गावकर, गणेशोत्सव आणि मंडप बांधकाम समितीचे पदाधिकारी हरी नाईक गावकर, राघोबा नाईक गावकर, बबन नाईक, मनोहर नाईक, नितीन गाड्डी आदी प्रतिनिधी उपस्थित होते.

अधिकाऱ्यांनीही वस्तुस्थिती जाणून घ्यावी

या बैठकीत उपस्थितांनी नवरात्रोत्सव काळात प्रशासनाने जे निर्णय घेतले, ते दबावाखाली घेतल्याचा दावा केला. गावाचा इतिहास माहीत नसलेले देवस्थान समितीतील दोन पदाधिकारी उत्सव बंद पाडण्यासाठी विघ्ने निर्माण करतात.

प्रशासकीय अधिकारीही वस्तुस्थिती आणि इतिहास जाणून न घेताच निर्णय घेतात, असा आरोप हरी नाईक गावकर, राघोबा नाईक, बबन नाईक यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT