Bicholim News Dainik Gomantak
गोवा

Bicholim News: मयेतील कळसोत्सव यंदाही रद्द; भक्तांच्या उत्साहावर विरजण

Bicholim News: देवीचा कळस पुन्हा मंदिरात

Ganeshprasad Gogate

Bicholim News: वादाच्या विळख्यात अडकलेला मयेतील श्री माया केळबाय देवस्थानचा प्रसिद्ध कळसोत्सव यंदाही रद्द करण्यात आला आहे.

कळसोत्सव रद्द झाल्याने आणि देवीचे घरोघरी आगमन होणार नसल्याने मयेतील समस्त भाविकांच्या उत्साहावर मात्र विरजण पडले आहे.

गेल्यावर्षी अर्ध्यावरच कळसोत्सव बंद करण्याची वेळ आली होती. यंदा काल (गुरुवारी) सायंकाळी कळस मंदिराबाहेर काढल्यानंतर केळबायवाडा येथील श्री केळबाय देवीच्या मंदिराकडे नेण्यात आला होता.

मात्र, त्या ठिकाणी मोठ्या संख्येने जमलेल्या नाईक गटातील लोकांनी मंदिराच्या प्रवेशद्वारावरच कळस रोखून धरला. त्यामुळे कळस मंदिरात आत नेता आला नाही.

अखेर अवसारी मोडासह कळस माघारी फिरला आणि सरळ कुंभारवाडा येथील श्री सातेरी मंदिरात गेला. केळबायवाडा येथे कळस रोखण्यात आला, त्याचवेळी कळसोत्सवावर वादाची ठिणगी पडली होती.

त्यामुळे या कळसोत्सवाबाबत अनिश्चितता निर्माण झाली होती. पूर्ण नऊ दिवसांपर्यंत हा उत्सव निर्विघ्नपणे साजरा होणार की नाही, त्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.

गेल्यावर्षी तणाव निर्माण झाल्यानंतर अर्ध्यावरच बंद करण्यात आला होता.

यंदाही त्याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता गृहीत धरून अखेर कळसोत्सव रद्द करण्याचा निर्णय देवस्थान समितीने घेतला.

आज सकाळी श्री सातेरी मंदिरातून देवीचा कळस पुन्हा श्री महामाया देवीच्या मंदिरात नेण्यात आला.

देवींची भेट नाहीच:-

शेकडो भक्तगणांच्या साक्षीने काल सायंकाळी पोलिस बंदोबस्तात गावकरवाडा येथील श्री महामाया मंदिरातून देवीचा कळस बाहेर काढण्यात आला होता. त्यामुळे यंदा कळसोत्सव पूर्ण नऊ दिवस साजरा होणार अशी आशा भाविक भक्तांमध्ये निर्माण झाली होती.

मात्र, केळबायवाडा येथे कळस येताच नाईक गटातील नागरिकांनी श्री केळबाय देवीच्या मंदिराच्या प्रवेशद्वारावरच कळस रोखून धरला.

मंदिरात प्रवेश मिळणार नसल्याचे स्पष्ट होताच अवसारी मोडासह कळस माघारी फिरून थेट श्री सातेरी देवीच्या मंदिरात गेला. देवीच्या कळसाला श्री केळबाय देवीच्या मंदिरात प्रवेश मिळाला नसल्याने अखेर दोन्ही देवींची भेट झालीच नाही.

एकाही घरात कळस नाही:-

गेल्यावर्षी कळसोत्सव सुरळीतपणे सुरू असतानाच पाचव्या दिवशी रात्री जांभूळभाट येथे वाटतेच कळस रोखून धरण्यात आला होता. त्यावेळी तणावाचे वातावरण निर्माण झाल्यानंतर अर्ध्यावरच कळसोत्सव बंद करण्यात आला.

गेल्यावर्षी गावातील बहुतांश घरांनी देवीच्या कळसाचे आगमन होवून भाविकांनी कळसाची पूजाअर्चा केली होती. यंदा मात्र एकाही भक्ताच्या घरी देवीच्या कळसाची भेट होऊ शकली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: रविवारचा दिवस ठरणार टर्निंग पॉईंट! नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना मिळणार मोठी गुड न्यूज, पण 'या' राशींनी राहावे अत्यंत सावध

Jungle Life and Biodiversity: निसर्गाची 'जंगल' ही कादंबरी; पशू-पक्ष्यांपासून वृक्षवेलींपर्यंत उलगडते निसर्गाची अद्भुत जीवनकथा

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

SCROLL FOR NEXT