Goa Bicholim Market Controversy Dainik Gomantak
गोवा

Goa Controversy: गोव्यातील बाजारात भाजी विक्रेत्यांच्या दोन गटांत पुन्हा वाद!

Goa Controversy: 'लमाणी' भाजी विक्रेत्यांच्या दोन गटांत झालेल्या वादाने काहीवेळ बाजारात तणाव निर्माण झाला होता.

दैनिक गोमन्तक

Goa Controversy: डिचोली बाजारात 'लमाणी' भाजी विक्रेत्यांच्या दोन गटांत झालेल्या वादाचे रूपांतर हातघाईवर येऊन दोन्ही गटांतील महिला मिळून एकमेकांना मारहाण करण्यात आली. हाताला मिळेल ती वस्तू घेऊन एकमेकांना मारहाण करण्यात आली.

काहीवेळ बाजारात तणावही निर्माण झाला. हा प्रकार काल आठवडी बाजाराच्या दिवशी सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास घडला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे बाजारहाटीसाठी आलेल्या ग्राहकांनाही बराच मनस्ताप सहन करावा लागला.

नगराध्यक्ष कुंदन फळारी बाजारात दाखल झाले. पोलिसांनाही पाचारण करण्यात आले. तोपर्यंत वाद निवळला होता. आणि पोलिस येताच मारामारी करणारे बाजारातून गायब झाले. दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. अशी तंबी नगराध्यक्ष श्री. फळारी यांनी बाजारातील विक्रेत्यांना दिली आहे.

पालिकेत आज चर्चा

बाजारात बसणाऱ्या लमाणी विक्रेत्यांना चर्चेसाठी आज सकाळी पालिकेत बोलाविण्यात आले आहे. तेथे त्यांना भांडणाबाबत निश्चितपणे जाब विचारण्यात येण्याची शक्यता आहे.

बाजारात भांडणाऱ्यांना प्रतिबंध करा

डिचोलीच्या आठवडी बाजारात अधूनमधून भाजी विक्रेत्यांमध्ये वाद सुरुच असतात. काही महिन्यांपूर्वी दोन गटात मारामारी झाली होती. त्यानंतर पालिकेने संबंधीत विक्रेत्यांना काही आठवडे बाजारात बसण्यास मनाई केली होती. पुन्हा वाद होऊ लागल्याने संबंधीत विक्रेत्यांना बाजारात बसण्यास प्रतिबंध करावा, अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT