CM Pramod Sawant | Goa News  Dainik Gomantak
गोवा

Pramod Sawant: जागा खरेदी करून कन्नडभवन बांधा

Pramod Sawant: कर्मभूमी कन्नड संघाचे संमेलन उत्साहात

दैनिक गोमन्तक

Pramod Sawant: गोव्यात वास्तव्य करणाऱ्या कन्नडीगांसह राज्याबाहेरील प्रत्येकाने राज्याचे कायदे पाळायलाच हवेत, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले. कर्मभूमी कन्नड संघ, डिचोलीतर्फे आयोजित कन्नड सांस्कृतिक संमेलनाचे उद्घाटन केल्यानंतर ते प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते.

गोव्यात कन्नड भवन व्हावे, अशी कन्नड बांधवांची जी मागणी आहे. त्याला सरकारची कोणतीही हरकत नाही. मात्र हे भवन कन्नड बांधवांनी स्वखर्चाने बांधावे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले.

बंगळूरू येथील कन्नड आणि सांस्कृतिक विभाग आणि कर्नाटक जागृती वेदिके यांच्या संयुक्त विद्यमाने येथील हिराबाई झांट्ये स्मृती सभागृहात हुक्केरी मठाचे चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजींच्या उपस्थितीत आयोजित या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी बांगळूरू येथील सार्वजनिक वाचनालय विभागाचे संचालक डॉ. सतीशकुमार होसमणी उपस्थित होते.

यावेळी मंत्री निळकंठ हळर्णकर, डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट, कलंगुटचे आमदार मायकल लोबो, माजी सभापती राजेश पाटणेकर, डिचोलीचे नगराध्यक्ष कुंदन फळारी, हनुमंतप्पा शिरूर आदी कन्नड संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

चंद्रशेखर शिवाचार्य स्वामी यांनी बोलताना डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकारला आशीर्वाद दिले दिवसभर चाललेल्या या संमेलनात कन्नड संस्कृतीचे दर्शन घडविणारे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.

शहरात भव्य रॅली

संमेलनाच्या उद्‌घाटनापूर्वी ढोलताशांच्या निनादात कन्नड भगिनींतर्फे डोक्यावर कुंभ घेऊन शहरात भव्य रॅली काढली. गावकरवाडा येथील श्री शांतादुर्गा मंदिराकडून रॅलीला प्रारंभ झाला. संमेलनस्थळी येताच रॅलीची सांगता झाली. या रॅलीत शेकडो कन्नड भगिनी सहभागी झाल्या होत्या. या रॅलीतून शहरात कन्नडिगांचे शक्तिप्रदर्शन दिसून आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT