Govind Gaude | Goa News Dainik Gomantak
गोवा

Govind Gaude: वाळवंटी परिसर पर्यटनस्थळ करण्याचा विचार

Govind Gaude: साखळीतील नौकानयन स्पर्धेचे बक्षीस वितरण : कलेला पाठिंबा द्या

दैनिक गोमन्तक

Govind Gaude: राज्यस्तरीय त्रिपुरारी पौर्णिमा साजरी होत असलेल्या विठ्ठलापूर-साखळी येथील श्री विठ्ठल मंदिरासह वाळवंटी परिसराचा पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्याचा विचार आहे, असे कला आणि संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी स्पष्ट केले.

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त घेतलेल्या राज्यस्तरीय नौकानयन स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात मंत्री गावडे प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. साखळी येथील रवींद्र भवनात हा सोहळा आयोजिण्यात आला होता.

या सोहळ्यास खास अतिथी म्हणून मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट, कारापूर-सर्वणचे सरपंच दत्तप्रसाद खारकांडे, दीपावली उत्सव समितीचे अध्यक्ष शैलेश फातर्पेकर, कला आणि संस्कृती खात्याचे सचिव नारायण सावंत, संचालक सगुण वेळीप, उपसंचालक अशोक परब आणि अधिकारी गायतोंडे उपस्थित होते. मंत्री गावडे व मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली.

बक्षिसांच्या रकमेत वाढ

त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने उपस्थित राहणाऱ्या हजारो भक्तगणांसह पर्यटकांना नौकाविहार स्पर्धेचा आणि कलाकारांच्या कलेचा आस्वाद घेण्याची संधी मिळत आहे. तसेच स्पर्धक संस्थांच्या मागणीनुसार यापुढे नौकाविहार स्पर्धेच्या बक्षिसांच्या रकमेत वाढ करण्यात येणार असल्याची घोषणा मंत्री गोविंद गावडे यांनी केली. पुढच्या वर्षी प्रथम क्रमांकासाठी रोख 50 हजार रुपयांचे बक्षीस दिले जाईल, असे त्यांनी सांगितले.

तळखांबेश्वर बॉइज प्रथम

राज्यस्तरीय नौकानयन स्पर्धतील विजेते पुढीलप्रमाणे-प्रथम- तळखांबेश्वर बॉइज (पर्ये-सत्तरी), द्वितीय- कलियुगी बॉइज (विठ्ठलापूर), तृतीय- भूमी बॉइज (पर्ये), चौथे- एन.सी. ग्रुप (विठ्ठलापूर) आणि पाचवे- ओव्हरलॉक्ड (पर्ये). उत्तेजनार्थ-सारंग (होंडा-सत्तरी), भूतनाथ बॉइज (आमोणे), सिक्स ब्रदर्स (पर्ये-सत्तरी), त्रिपुरांतक (विठ्ठलापूर-साखळी) आणि युनिक बॉइज (पर्ये-सत्तरी).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Samuel Braganza Case: सॅम्युअल मृत्यूप्रकरणी गोपनीय अहवाल सादर, प्रकरणाला निर्णायक वळण; दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार

Cricketer Suicide: 'माझी संघात निवड झाली नाही...'; सुसाइड नोट लिहून क्रिकेटपटूची आत्महत्या, क्रीडाविश्वात हळहळ

Bhiwandi Building Collapse: 'जीव वाचवण्यासाठी पहिल्या मजल्यावरून उडी मारली'; भिवंडी दुर्घटनेत बचावलेल्यांनी सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव VIDEO

Salaulim Dam: साळावली धरण अखेर 'ओव्‍हरफ्‍लो', यंदा तब्‍बल 35 दिवसांचा विलंब; पर्यटकांसाठी निसर्गाचा आकर्षक नजराणा

Rohit Sharma Message Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीनंतर रोहित शर्माची भावनिक पोस्ट; म्हणाला, "अनेक वर्षे एकाच ड्रेसिंग रूममध्ये..."

SCROLL FOR NEXT